लंडन, 7 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 4th Test) 157 रननी दणदणीत विजय झाला. भारताने ठेवलेल्या 368 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा अखेरच्या दिवशी ऑल आऊट झाला. या विजयासोबतच भारताने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला. यानंतर लीड्सवरच्या टेस्टमध्ये इंग्लंडने पुनरागमन केलं. तर ओव्हलमध्ये भारताने तब्बल 50 वर्षांनी टेस्ट मॅच जिंकली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट शुक्रवार 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मॅनचेस्टरमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. सीरिज वाचवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणं गरजेचं आहे, पण त्याआधी इंग्लंडसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. पाचव्या टेस्टमध्ये पहिले दोन दिवस मॅनचेस्टरमध्ये पावसाचा अंदाज (Manchester Weather) हवामान खात्याने वर्तवला आहे, तर रविवारीही काही काळ पाऊस पडेल, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

पहिले तीन दिवस पावसामुळे खेळात व्यत्यय आला तर इंग्लंडला अखेरच्या दोन दिवसात मॅच जिंकण्यासाठी जीवाचं रान करावं लागणार आहे. 2007 साली भारताने इंग्लंडमध्ये अखेरची टेस्ट सीरिज जिंकली होती, त्यावेळी राहुल द्रविड टीम इंडियाचा कर्णधार होता. यानंतर तीन दौऱ्यांमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.