पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा लंच लवकर घेतला गेला तेव्हा बेयरस्टो 112 बॉलमध्ये 91 रनवर खेळत होता. लंचनंतर लगेचच त्याने टेस्ट करियरमधलं 11वं शतक पूर्ण केलं. या खेळीमध्ये त्याने 14 फोर आणि 2 सिक्स मारले. यावर्षातलं त्याचं हे पाचवं शतक आहे. आधी ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये बेयरस्टोने शतक केलं. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध 1 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 शतकी खेळी केल्या. बेयरस्टो यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. आतापर्यंत 8 टेस्ट मॅचमध्ये त्याने 850 पेक्षा जास्त रन केले.The glorious summer of Jonny Bairstow
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01 #ENGvIND | @IGcom pic.twitter.com/Ycl8Odq8ur — England Cricket (@englandcricket) July 3, 2022
काय म्हणाला कोहली? मोहम्मद शमीचा बॉल बेयरस्टोला खेळता आला नाही, यानंतर कोहली बेयरस्टोला काहीतरी बोलला. यावर बेयरस्टोने विराटला प्रत्युत्तर दिलं. तेव्हा विराट बेयरस्टोच्या जवळ गेला आणि दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. या दोघांमधलं संभाषण स्टम्प माईकमध्ये कैद झालं. मला सांगू नको, काय करायचं ते. तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, असं विराट बेयरस्टोला म्हणाला. विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यातला वाद थांबवण्यासाठी अंपायरना मध्ये यावं लागलं. दोन्ही अंपायरनी विराट आणि बेयरस्टोला शांत व्हायला सांगितलं. मोहम्मद शमीची ओव्हर संपली तेव्हा विराट आणि बेयरस्टो यांच्यात पुन्हा चर्चा झाली, यावेळी दोघं हसताना दिसले.It's tense out there between Virat Kohli and Jonny Bairstow #ENGvIND pic.twitter.com/3lIZjERvDW
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 3, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virat kohli