Home /News /sport /

IND vs ENG : ते 12 पॉईंट्स ठरवणार टीम इंडियाच्या WTC Final चं भवितव्य, असं आहे गणित

IND vs ENG : ते 12 पॉईंट्स ठरवणार टीम इंडियाच्या WTC Final चं भवितव्य, असं आहे गणित

टीम इंडिया इंग्लंडमध्ये (India vs England) पोहोचली आहे. कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंसोबत सरावालाही सुरूवात केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट मागच्या वर्षी कोरोनामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही टेस्ट मॅच जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे (WTC) 12 पॉईंट्स मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

पुढे वाचा ...
    लंडन, 20 जून : टीम इंडिया इंग्लंडमध्ये (India vs England) पोहोचली आहे. कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंसोबत सरावालाही सुरूवात केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमात्र टेस्ट 1 जुलैपासून होणार आहे. हा सामना मागच्या वर्षीच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजचा भाग आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट मागच्या वर्षी कोरोनामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही टेस्ट मॅच जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे (WTC) 12 पॉईंट्स मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाच्या मागच्या इंग्लंड दौऱ्यात रवी शास्त्री कोच, विराट कोहली कर्णधार आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधार होते, यावेळी मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राहुल द्रविडच्या रुपात टीमला 8 महिन्यांपूर्वीच नवा कोच मिळाला आहे. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्यानंतर विराटने टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडली, त्यामुळे रोहित शर्माला कर्णधार करण्यात आलं. अजिंक्य रहाणे टीममधून बाहेर झाल्यानंतर केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आलं, पण दुखापतीमुळे राहुल दौऱ्याला मुकणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या या टेस्टनंतर टीम इंडिया बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. यातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज भारतामध्ये होणार आहे. विजय मिळाल्यास 60 टक्के पॉईंट्स टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 75 टक्के पॉईंट्ससह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका 71.43 टक्के पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडे सध्या 58.33 टक्के पॉईंट्स आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत 11 मॅच खेळल्या, यातल्या 6 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तर 3 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि 2 मॅच ड्रॉ झाल्या. स्लो ओव्हर रेटमुळे टीमचे 3 पॉईंट्स रद्दही करण्यात आले. भारतीय टीमने जर इंग्लंडचा पराभव केला तर त्यांचे 60 टक्के पॉईंट्स होतील. श्रीलंका 55.56 टक्क्यांसह चौथ्या आणि पाकिस्तान 52.38 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या