मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : मॅनचेस्टर टेस्ट रद्द व्हायची शक्यता, गांगुलीने दिली मोठी Update

IND vs ENG : मॅनचेस्टर टेस्ट रद्द व्हायची शक्यता, गांगुलीने दिली मोठी Update

भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या टेस्टवर संकट ओढावलं आहे. टीम इंडियातल्या सपोर्ट स्टाफमधल्या एकाला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे.

  • Published by:  Shreyas

मॅनचेस्टर, 9 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या टेस्टवर संकट ओढावलं आहे. टीम इंडियातल्या सपोर्ट स्टाफमधल्या एकाला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. यानंतर सगळ्या खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. खेळाडूंचे रिपोर्ट गुरुवारी रात्री 9 वाजता येणार आहेत. जर या रिपोर्टमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह आले तर टेस्ट मॅच रद्द करण्यात येईल. खेळाडू निगेटिव्ह आले तर मात्र ही टेस्ट वेळेवर सुरू होईल. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही (Sourav Ganguly) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मॅनचेस्टर टेस्ट होणार का नाही, याबाबत आपल्याला माहिती नाही, असं गांगुली म्हणाला.

टीम इंडियाचा ज्युनियर फिजियो योगेश परमार (Yogesh Parmar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. योगेश परमारआधी ओव्हल टेस्टदरम्यान टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) हेदेखील पॉझिटिव्ह आले होते. परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळे खेळाडू हॉटेल रूममध्ये क्वारंटाईन झाले आहेत. आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत खेळाडूंना हॉटेल रूमबाहेर येता येणार नाही.

मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाली तर विजेता कोण?

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाली तर भारतीय टीमला विजेता घोषित करण्यात येणार नाही. टेस्ट रद्द झाल्यास सीरिज अर्धवट झाल्याचं मानलं जाईल, तसंच अखेरची टेस्ट मॅच नंतर खेळवली जाईल.

आयपीएल (IPL 2021) वाचवण्यासाठी बीसीसीआयला मॅनचेस्टर होऊ नये, असं वाटत असल्याचं वृत्त आलं होतं. पण यानंतर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय मॅनचेस्टर टेस्ट खेळण्यासाठी आग्रही आहे, कारण या सीरिजमध्ये भारतीय टीम उत्कृष्ट कामगिरी करत आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये विजय मिळाल्यानंतर भारताचा लीड्समध्ये पराभव झाला, पण ओव्हलमध्ये पुन्हा एकदा भारताने विजय मिळवला. यानंतर आता पाचव्या टेस्टआधी भारताने इंग्लंडलवर दबाव वाढवला आहे.

मॅनचेस्टरमध्ये भारताचं खराब रेकॉर्ड

मॅनचेस्टरमध्ये टीम इंडियाचं रेकॉर्ड खराब आहे. या मैदानात भारताला एकही टेस्ट जिंकता आलेली नाही. मॅनचेस्टरमध्ये भारताने 9 पैकी 4 टेस्ट गमावल्या आणि 5 टेस्ट ड्रॉ झाल्या. या मैदानातली मागची टेस्ट भारताने इनिंगने गमावली होती.

First published:

Tags: Coronavirus, India vs england