Home /News /sport /

IND vs ENG : ओव्हलच्या पराभवानंतर इंग्लंडने केला मोठा बदल, भारताला त्रास देणाऱ्या खेळाडूचं कमबॅक!

IND vs ENG : ओव्हलच्या पराभवानंतर इंग्लंडने केला मोठा बदल, भारताला त्रास देणाऱ्या खेळाडूचं कमबॅक!

भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England 4th Test) 157 रनने पराभव झाला, या पराभवानंतर इंग्लंडच्या टीममध्ये बदल करण्यात आले आहेत.

    लंडन, 7 सप्टेंबर : भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England 4th Test) 157 रनने पराभव झाला. याचसोबत इंग्लंड सीरिजमध्ये 2-1 ने पिछाडीवर आहे. सीरिजची पाचवी आणि अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये सुरु होणार आहे. या मॅचसाठी इंग्लंडने टीममध्ये मोठे बदल केले आहेत. विकेट कीपर बॅट्समन जॉस बटलर (Jos Buttler) आणि स्पिन बॉलर जॅक लीच (Jack Leach) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. लीचने या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 18 विकेट घेतल्या होत्या. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. सॅम बिलिंग्सला (Sam Billings) पुन्हा एकदा त्याची काऊंटी टीम केंटमध्ये पाठवण्यात आलं आहे. चौथ्या टेस्टसाठी बिलिंग्सचा इंग्लंडच्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. जॉस बटलरची पत्नी बाळाला जन्म देणार असल्यामुळे त्याने चौथ्या टेस्टमधून माघार घेतली होती. आता त्याचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. सीरिजमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडने स्पेशलिस्ट स्पिनरचा टीममध्ये समावेश केला आहे. याआधी ऑलराऊंडर आणि ऑफ स्पिनर असलेल्या मोईन अलीला (Moeen Ali) घेऊन इंग्लंडची टीम मैदानात उतरली होती. आता जॅक लीचचा टीममध्ये समावेश झाल्यामुळे तो पाचवी टेस्ट खेळेल, अशी अपेक्षा आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या जॅक लीचने फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर झालेल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उत्कृष्ट बॉलिंग केली होती. 29 च्या सरासरीने त्याने सर्वाधिक 18 विकेट मिळवल्या होत्या. इंग्लंडच्या इतर कोणत्याही बॉलरला 10 विकेटचा आकडाही गाठता आला नव्हता. 54 रनवर 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. या सीरिजमध्य इंग्लंडचा 3-1 ने पराभव झाला होता. 30 वर्षांचा जॅक लीच इंग्लंडकडून 16 टेस्ट खेळला आहे. यात त्याने 30 च्या सरासरीने 62 विकेट घेतल्या, यात 2 वेळा त्याने इनिंगमध्ये 5 विकेट मिळवल्या. 83 रन देऊन 5 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लीचने 105 मॅचमध्ये 339 विकेट मिळवल्या, यात त्याला 22 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि 3 वेळा मॅचमध्ये 10 विकेट पटकावल्या. पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम जो रूट, मोईन अली, जेम्स अंडरसन, जॉनी बेयरस्टो, रोरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेव्हिड मलान, जॅक लीच, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिनसन, क्रिस वोक्स, मार्क वूड
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या