Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियाने लाज घालवली, 378 रनचं आव्हान रोखण्यातही बुमराहचे बॉलर फेल

IND vs ENG : टीम इंडियाने लाज घालवली, 378 रनचं आव्हान रोखण्यातही बुमराहचे बॉलर फेल

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या (India vs England 5th Test) बॉलरनी लाजिरवाणी कामगिरी केली आहे. शेवटच्या इनिंगमध्ये 378 रनचं आव्हान रोखण्यातही भारतीय बॉलर्सना अपयश आलं आहे. जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) नाबाद शतकांच्या मदतीने इंग्लंडने हे आव्हान 76.4 ओव्हरमध्ये पार केलं.

पुढे वाचा ...
    बर्मिंघम, 5 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या (India vs England 5th Test) बॉलरनी लाजिरवाणी कामगिरी केली आहे. शेवटच्या इनिंगमध्ये 378 रनचं आव्हान रोखण्यातही भारतीय बॉलर्सना अपयश आलं आहे. जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) नाबाद शतकांच्या मदतीने इंग्लंडने हे आव्हान 76.4 ओव्हरमध्ये पार केलं. जो रूटने नाबाद 142 तर बेयरस्टोने नाबाद 114 रनची खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दिवसाअखेरीस 3 विकेट गमावून 259 रन केले, ज्यामुळे त्यांना पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 गरज होती. इंग्लंडने हे आव्हान फक्त दीड तासामध्येच पार केलं. भारतीय बॉलर्सना अखेरच्या दिवशी एकही विकेट घेता आली नाही. मॅचच्या चौथ्या दिवशी एलेक्स लिस आणि जॅक क्राऊली यांच्यात 107 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली, यानंतर भारताला लागोपाठ तीन विकेट मिळाल्या, त्यानंतर मात्र बॉलर्स सपशेल अपयशी ठरले. या विजयासोबतच इंग्लंडने 5 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली आहे. सीरिजच्या पहिल्या 4 टेस्ट मागच्या वर्षी झाल्या होत्या, पण पाचव्या टेस्टआधी टीम इंडियामध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे सामना पुढे ढकलण्यात आला होता. हा सामना आता खेळवला गेला. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 416 रनचा डोंगर उभा केला. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी शतकी खेळी केल्या, यानंतर भारतीय बॉलर्सनी इंग्लंडला 284 रनवर रोखलं, त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 132 रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगआधी बेयरस्टोने पहिल्या इनिंगमध्येही शतक केलं होतं. भारताचा दुसऱ्या इनिंगमध्ये 245 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे इंग्लंडला 378 रनचं आव्हान मिळालं. इंग्लंडचं टेस्ट क्रिकेटमधलं हा सगळ्यात मोठा यशस्वी पाठलाग आहे. तर दुसरीकडे एवढं मोठं आव्हान देऊनही पराभव झाल्याची टीम इंडियासोबतची ही पहिलीच घटना आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या