Home /News /sport /

IND vs ENG : ...ते दोन Photo शेअर करून इंग्लंड बोर्डाने विराट कोहलीला डिवचलं!

IND vs ENG : ...ते दोन Photo शेअर करून इंग्लंड बोर्डाने विराट कोहलीला डिवचलं!

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) दारूण पराभव झाला आहे. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि जो रूट (Joe Root) यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. भारताविरुद्धच्या या विजयानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) दारूण पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 378 रनचं अशक्य वाटणारं आव्हान इंग्लंडने चौथ्या इनिंगमध्ये अगदी सहज पार केलं. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि जो रूट (Joe Root) यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. या विजयासोबतच इंग्लंडने 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली आहे. भारताविरुद्धच्या या विजयानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला आहे. इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात बाचाबाची झाली होती. हा वाद सोडवण्यासाठी अंपायरना हस्तक्षेप करावा लागला होता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेयरस्टो आणि विराटच्या वादाचा एक फोटो आणि मॅच संपल्यानंतर विराट बेयरस्टोला मिठी मारतानाचा एक फोटो असे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तोंडाला चिकटपट्टी लावलेली स्माईली कॅप्शन म्हणून दिली आहे. जॉनी बेयरस्टोने या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शतकं केली. काय झाला वाद? तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) क्रीजवर होते. खेळ सुरू झाल्यानंतर मोहम्मद शमी बॉलिंग करत असताना स्लिपमध्ये उभा असलेला कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात बोलणं झालं. मोहम्मद शमीचा बॉल बेयरस्टोला खेळता आला नाही, यानंतर कोहली बेयरस्टोला काहीतरी बोलला. यावर बेयरस्टोने विराटला प्रत्युत्तर दिलं. तेव्हा विराट बेयरस्टोच्या जवळ गेला आणि दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. या दोघांमधलं संभाषण स्टम्प माईकमध्ये कैद झालं. मला सांगू नको, काय करायचं ते. तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, असं विराट बेयरस्टोला म्हणाला. सेहवागचा निशाणा कोहलीच्या या स्लेजिंगवरून सेहवागनेही त्याच्यावर निशाणा साधला.  'कोहलीच्या स्लेजिंगआधी बेयरस्टोचा स्ट्राईक रेट 21 होता. पण स्लेजिंगनंतर तो 150 च्या स्ट्राईक रेटने खेळला. बेयरस्टो पुजारासारखा खेळत होता, पण कोहलीच्या स्लेजिंगमुळे तो पंत झाला,' असं ट्वीट सेहवागने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या