Home /News /sport /

IND vs ENG : त्या भेदक स्पेलआधी बुमराह विराटजवळ गेला आणि म्हणाला...

IND vs ENG : त्या भेदक स्पेलआधी बुमराह विराटजवळ गेला आणि म्हणाला...

टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत इंग्लंडचा चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) 157 रननी पराभव केला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याच्या भेदक स्पेलआधी आपल्याला काय म्हणाला, हे टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
    लंडन, 6 सप्टेंबर : टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत इंग्लंडचा चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) 157 रननी पराभव केला. याचसोबत भारताने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडिया ओव्हलच्या मैदानात मॅच वाचवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी उतरली होती, असं टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सामन्यानंतर म्हणाला. विराट कोहलीने या कामगिरीबद्दल टीमसोबतच जसप्रीत बुमराहचंही (Jasprit Bumrah) खास कौतुक केलं. लंचनंतर बुमराहने माझ्याकडे बॉल मागितला आणि त्यानंतर मॅचचं चित्रच बदलल्याचं विराटने सांगितलं. लंडनच्या ओव्हल मैदानात झालेल्या या सामन्यात भारताची पहिली इनिंग 191 रनवर संपुष्टात आली. मग इंग्लंडने 290 रन केले, त्यामुळे त्यांना 99 रनची आघाडी मिळाली. यानंतर भारताने रोहित शर्माचं (Rohit Sharma) शतक आणि इतर बॅट्समनच्या चांगल्या कामगिरीमुळे दुसऱ्या इनिंगमध्ये 466 रन केले, त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 368 रनचं आव्हान मिळालं, पण अखेरच्या दिवशी इंग्लंडचा 210 रनवर ऑल आऊट झाला. 'टीमने ज्याप्रकारचा खेळ दाखवला त्याचा मला अभिमान आहे. आम्ही बचावात्मक खेळण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी मैदानात उतरलो होतो. परिस्थिती कठीण होती. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जेव्हा बॉलिंग करत होता, तेव्हा आमच्याकडे संधी आहे, हे आम्हाला माहिती होतं. आपण 10 विकेट घेऊ शकतो, हा विश्वास आम्हाला होता. बुमराह लंचनंतर माझ्याकडे आला आणि म्हणाला मला बॉल दे. त्याने एका स्पेलमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि सामन्याचं चित्र पलटलं,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली. जसप्रीत बुमराहने मॅचच्या पाचव्या दिवशी रिव्हर्स स्विंग बॉलिंगचा नजरणा पेश केला. ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला बुमराहने बोल्ड केलं. यानंतर रवींद्र जडेजाने मोईन अलीची विकेट घेत इंग्लंडच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. 'रोहितची बॅटिंग जबरदस्त होती. शार्दुल ठाकूरने वेगळ्याच प्रकारचा खेळ दाखवला. त्याच्या दोन अर्धशतकांनी विरोधी टीमला बॅकफूटवर नेलं. आम्ही विश्लेषण आणि आकड्यांवर लक्ष देत नाही. आम्हाला कशावर लक्ष केंद्रीत करायचं आहे, ते माहिती आहे. आम्ही ग्रुप म्हणून निर्णय घेतो. विजयामुळे सगळेच आनंदी आहेत. हा विजय आम्हाला पुढची मॅच जिंकण्याची प्रेरणा देईल. आम्हाला स्वत:वर विश्वास आहे,' असं वक्तव्य विराटने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Jasprit bumrah, Virat kohli

    पुढील बातम्या