Home /News /sport /

IND vs ENG : 5 वर्षांपूर्वी मोदींनी ज्यासाठी कौतुक केलं, विराटने पुन्हा तेच काम केलं, VIDEO

IND vs ENG : 5 वर्षांपूर्वी मोदींनी ज्यासाठी कौतुक केलं, विराटने पुन्हा तेच काम केलं, VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 4th Test) 157 रनने रोमांचक विजय मिळवला. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीयच नाही तर इंग्लडच्या चाहत्यांचीही मनं जिंकली आहेत.

पुढे वाचा ...
    लंडन, 7 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 4th Test) 157 रनने रोमांचक विजय मिळवला. याचसह भारताने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीयच नाही तर इंग्लडच्या चाहत्यांचीही मनं जिंकली आहेत. या मॅचनंतरच विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम ड्रेसिंग रूममध्ये जात होत्या, तेव्हा बाऊंड्री लाईनच्या आतमध्ये पाण्याची बॉटल पडलेली होती. ही बॉटल जो रूट आणि विराट कोहली या दोघांना दिसली, पण जो रूट बॉटलच्या बाजूने निघून गेला. तर विराटने ती बॉटल उचलली आणि ड्रेसिंग रूममध्ये नेली. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच कारणामुळे विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. इंदूरमधल्या सामन्याआधी सराव सामन्यादरम्यान विराट कोहलीने मैदानातला कचरा साफ केला. मैदानात पडलेल्या बॉटल विराटने जवळच असलेल्या कचरापेटीमध्ये टाकल्या. हे वृत्त बघितल्यानंतर पंतप्रधानांनी विराट कोहलीचं कौतुक केलं. तुमच्या या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असं पंतप्रधान विराटला म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या अखेरच्या टेस्ट मॅचआधी विराटने मैदानात सफाई केली होती. 'प्रिय कोहली, मी एका न्यूज चॅनलवर तुझ्या क्लीन इंडिया कॅम्पेनला पाहिलं. तुझा हा छोटा प्रयत्न अनेकांना प्रेरणा देईल,' असं ट्वीट मोदींनी केलं. मोदींच्या या ट्वीटवर विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली. धन्यवाद सर, आम्ही सगळे या देशाला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही केलेल्या या कौतुकाबाबत अभिमान वाटतो, असं विराट म्हणाला. इंदूरच्या मैदानात विराटला कचरा साफ करताना बघून मैदानातले कर्मचारी सफाई करायला आले, पण विराटने त्यांना रोखलं. कचरा आम्ही केला, तर सफाईदेखील आम्हीच करणार, असं विराटने कर्मचाऱ्यांना सांगितलं. याआधी 2016 साली भारतीय टीमने गांधी जयंतीच्या निमित्त इडन गार्डन मैदानातही साफ सफाई केली होती, त्यावेळी विराटसोबत बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष अनुराग ठाकूरही खेळाडूंसोबत झाडू घेऊन स्टेडियमची सफाई करत होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या