मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : चौथ्या टेस्टमध्ये होणार 3 बदल, विराट टीम बदलणार!

IND vs ENG : चौथ्या टेस्टमध्ये होणार 3 बदल, विराट टीम बदलणार!

चौथ्या टेस्टमध्ये विराटने टीम बदलली पण फॉर्म्युला तोच

चौथ्या टेस्टमध्ये विराटने टीम बदलली पण फॉर्म्युला तोच

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Third Test) इनिंग आणि 76 रनने पराभव झाला. या पराभवानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) चौथ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल होतील, असे संकेत दिले.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Third Test) इनिंग आणि 76 रनने पराभव झाला. लॉर्ड्सवरच्या पराभवाचा बदला इंग्लंडच्या टीमने लीड्सवर घेतला आणि सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली. या पराभवानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडच्या बॉलर्सनी आमच्या बॅट्समनना चुका करायला भाग पाडलं, असं सांगितलं. लीड्सची खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली होती, पण भारतीय बॅट्समनचं शॉट सिलेक्शन अत्यंत खराब होतं.

तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने चौथ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल करण्याचे संकेतही दिले. पराभव नाही तर थकव्याचं कारण देत टीममध्ये बदल होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. लागोपाठ तीन टेस्ट खेळल्यानंतर खेळाडूंना थकवा येणं साहजिक आहे, त्यामुळे चौथ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल होऊ शकतात, असं विराट अप्रत्यक्षपणे म्हणाला.

खेळाडूंना आराम द्यायचा असेल, तर त्यासाठी बदली खेळाडूही टीमकडे उपलब्ध आहेत. चौथी टेस्ट मॅच 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये होणार आहे. ओव्हलची खेळपट्टी बहुतेकवेळा स्पिन बॉलिंगला मदत करते, त्यामुळे दोन स्पिनर घेऊन टीम इंडिया मैदानात उतरू शकते.

अजिंक्य रहाणेला आराम?

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या सीरिजमध्ये अपयशी ठरला आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये रहाणेने अर्धशतक केलं, पण तो फॉर्ममध्ये दिसत नाही. रहाणेने या सीरिजमध्ये 19 च्या सरासरीने 95 रन केले आहेत. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने 44 पेक्षा जास्तच्या सरासरीने 5,326 रन केले आहेत, ज्यात 14 शतकांचा समावेश आहे.

पुजाराऐवजी हनुमा विहारी?

चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) लीड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 91 रनची चांगली खेळी केली, पण सीरिजच्या 3 टेस्टच्या 5 इनिंगमध्ये त्याची कामगिरी खास झाली नाही, त्यामुळे पुजाराला आराम देऊन हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संधी मिळू शकते. पुजाराऐवजी मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) पर्यायही टीम इंडियापुढे उपलब्ध आहे. नॉटिंघम टेस्टच्या दोन दिवस आधी मयंक अग्रवालला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

अश्विनला इशांतऐवजी संधी?

लीड्स टेस्टमध्ये इशांत शर्माला (Ishant Sharma) प्रभाव पाडता आला नाही. तर सिराज, बुमराह आणि शमीने इंग्लंडच्या बॅट्समनना त्रास दिला. जडेजालादेखील लीड्सच्या खेळपट्टीवर स्पिनला मदत मिळत होती. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनला (R Ashwin) अजून खेळण्याची संधी मिळालेली नाही, त्यामुळे ओव्हलमध्ये अश्विनला खेळवलं जाऊ शकतं. तसंच अश्विन चांगली बॅटिंगही करू शकतो.

First published:

Tags: India vs england, Virat kohli