Home /News /sport /

IND vs ENG : आऊट झाल्यानंतर विराट संतापला, ड्रेसिंग रूममध्ये काय केलं पाहा, VIDEO

IND vs ENG : आऊट झाल्यानंतर विराट संतापला, ड्रेसिंग रूममध्ये काय केलं पाहा, VIDEO

आऊट झाल्यानंतर विराट संतापला

आऊट झाल्यानंतर विराट संतापला

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने (India vs England 4th Test) कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट गमावली. आऊट झाल्यानंतर विराट चांगलाच चिडला.

    लंडन, 5 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने (India vs England 4th Test) कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट गमावली आहे. पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर विराट आऊट झाला. 44 रनवर असताना मोईन अलीच्या (Moeen Ali) बॉलिंगवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्रेक ओव्हरटनने (Craig Overton) विराटचा कॅच पकडला. आऊट झाल्यानंतर विराट चांगलाच चिडला. विराटची विकेट गेल्यानंतर टीम इंडिया मात्र चांगलीच अडचणीत आली, कारण भारताचे सुरुवातीचे सहा बॅट्समन माघारी परतले. चुकीच्या क्षणी विकेट गेल्यामुळे विराटच्या चेहऱ्यावरही संताप दिसत होता. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर चिडलेल्या विराट कोहलीने भिंतीवर जोरात हात आपटला. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. या सीरिजमध्ये विराट कोहलीला अनेकवेळा चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात अपयश येत आहे. तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटने अर्धशतकं केली. मागच्या दोन वर्षांपासून विराट कोहलीला बॅटिंगमध्ये संघर्ष करावा लागला आहे. या दोन वर्षात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेलं नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या