Home /News /sport /

IND vs ENG : अश्विनऐवजी जडेजा टीममध्ये का? विराटने सांगितलं धक्कादायक कारण

IND vs ENG : अश्विनऐवजी जडेजा टीममध्ये का? विराटने सांगितलं धक्कादायक कारण

चौथ्या टेस्टमध्येही विराटने अश्विनला दिली नाही संधी

चौथ्या टेस्टमध्येही विराटने अश्विनला दिली नाही संधी

लीड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टीममध्ये दोन बदल केले आहेत. या मॅचमध्ये विराट आर.अश्विनला (R Ashwin) खेळवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण चाहत्यांची मात्र निराशा झाली.

पुढे वाचा ...
    लंडन, 2 सप्टेंबर : लीड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टीममध्ये दोन बदल केले आहेत. इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांना संधी देण्यात आली आहे. या मॅचमध्ये विराट आर.अश्विनला (R Ashwin) खेळवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण चाहत्यांची मात्र निराशा झाली. टेस्ट क्रमवारीत बॉलरच्या यादीत आर.अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तरीही त्याला संधी देण्यात आली नाही. या सीरिजच्या चारही टेस्टमध्ये अश्विनला खेळवण्यात आलं नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अश्विनऐवजी रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) का संधी दिली जात आहे, असा प्रश्न विराट कोहलीला टॉसवेळी विचारण्यात आला. त्यावेळी विराटने दिलेल्या उत्तराने अनेकजण हैराण झाले. रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) अश्विनऐवजी निवड करण्याचं विराटने कारण सांगितलं. इंग्लंडच्या टीममध्ये 4 डावखुरे बॅट्समन आहेत, त्यामुळे ऑफ स्टम्पबाहेरच्या फूटमार्कचा वापर जडेजा चांगल्या पद्धतीने करू शकतो, असा दावा विराट कोहलीने केला. डावखुऱ्या बॅट्समनसमोर ऑफ स्पिनरची बॉलिंग जास्त परिणामकारक असते. तसंच डावखुरे बॅट्समनना डावखुऱ्या बॉलरना खेळणं सोपं जातं, हे क्रिकेटचा इतिहास सांगतो, त्यामुळे विराटच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेन वॉर्न (Shane Warne) आणि मायकल वॉन (Michael Vaughan) या दोन क्रिकेटपटूंनीही अश्विनला न खेळवण्यावर टीका केली आहे. अश्विनला न खेळवणं हा हट्टीपणा आहे, असं शेन वॉर्न म्हणाला. भारतापेक्षा इंग्लंडची टीम जास्त संतुलित आहे. मी अश्विनला प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवडलं असतं. ओव्हलची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करते. फक्त पहिल्या इनिंगसाठी तुम्ही टीम निवडत नाही. इकडे बॉल स्पिन होतो आणि अश्विनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 5 शतकं आहेत. तरीही तुम्ही टीममध्ये एक असा बॅट्समन खेळवता, जो चांगली बॉलिंग करू शकतो, अशी टीका शेन वॉर्नने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना केली. मायकल वॉननेही टीम इंडियाच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 413 टेस्ट विकेट आणि 5 शतकं. यानंतरही अश्विनची टीममध्ये निवड होत नाही. इंग्लंडमध्ये 4 टेस्टमध्ये क्वचितच असं बघितलं गेलं असेल. हा खरंच मूर्खपणा आहे, असं मायकल वॉन म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, R ashwin, Ravindra jadeja, Virat kohli

    पुढील बातम्या