Home /News /sport /

IND vs ENG : पुजाराला 'खुन्नस' देणाऱ्या खेळाडूला उमेशने रडवलं! VIDEO

IND vs ENG : पुजाराला 'खुन्नस' देणाऱ्या खेळाडूला उमेशने रडवलं! VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 4th Test) 157 रननी विजय झाला. याचसह भारताने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे.

    लंडन, 7 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 4th Test) 157 रननी विजय झाला. याचसह भारताने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. जो रूटच्या (Joe Root) टीमला भारतीय बॉलर्सनी 210 रनवर ऑल आऊट केलं. भारताच्या या विजयात उमेश यादवचं (Umesh Yadav) योगदान मोलाचं राहिलं. त्याने दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. उमेश यादवने पहिल्या इनिंगमध्ये जो रूटसारख्या महत्त्वाच्या बॅट्समनला बोल्ड केलं. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने क्रेग ओव्हरटनचेही (Craig Overton) स्टम्प उडवले. उमेशने टाकलेला हा बॉल खेळताना ओव्हरटन जखमी झाला. उमेश यादवने गुड लेंथवर टाकलेला हा बॉल बाहेरच्या दिशेने स्विंग झाला. ओव्हरटनच्या दंडाला लागून बॉल स्टम्पवर आपटला. आऊट झाल्यानंतर ओव्हरटन दंडाला हात लावत पॅव्हेलियनच्या दिशेने गेला. हा बॉल जोरात लागल्याचं ओव्हरटनच्या हावभावावरून दिसत होतं. दुखापतीनंतर तो अखेरची टेस्ट खेळेल का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती, पण इंग्लंडने त्याचा टीममध्ये समावेश केला आहे. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये क्रेग ओव्हरटनने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) खुन्नस दिली होती. पुजाराने मैदानात येताच ओव्हरटनच्या एका ओव्हरमध्ये दोन फोर मारले. यानंतर त्याला राग आला आणि त्याने पुजाराच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. पुजारावर याचा काहीही फरक पडला नाही. 61 रनची महत्त्वाची खेळी करून तो आऊट झाला. पुजाराने रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) 153 रनची महत्त्वाची पार्टनरशीप केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Umesh yadav

    पुढील बातम्या