Home /News /sport /

IND vs ENG : तीन वर्षांत पहिल्यांदाच, विराट खेळला 'जुगार', रहाणेला इशारा?

IND vs ENG : तीन वर्षांत पहिल्यांदाच, विराट खेळला 'जुगार', रहाणेला इशारा?

चौथ्या टेस्टमध्ये विराटची वापरली नवी रणनिती

चौथ्या टेस्टमध्ये विराटची वापरली नवी रणनिती

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 4th Test) बॅटिंग पुन्हा गडगडली आहे. 39 रनवर टीम इंडियाचे सुरुवातीचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियाने आश्चर्यकारकरित्या रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं.

पुढे वाचा ...
    लंडन, 2 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 4th Test) बॅटिंग पुन्हा गडगडली आहे. 39 रनवर टीम इंडियाचे सुरुवातीचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. रोहित शर्मा (Rohit Sharma) 11 रनवर, केएल राहुल (KL Rahul) 17 रनवर आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 4 रनकरून आऊट झाला. क्रिस वोक्स, रॉबिनसन आणि जेम्स अंडरसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियाने आश्चर्यकारकरित्या रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. क्रिकेटमध्ये बॉलरना अनेकवेळा लेफ्ड हॅण्डेड आणि राईट हॅण्डेड बॅट्समनना एकाच वेळी बॉलिंग करताना अडचणी निर्माण होतात, त्यामुळे भारताने जडेजाला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवून वेगळी रणनिती अवलंबली. रवींद्र जडेजानेही मागच्या काही काळात आपल्या बॅटिंगवर प्रचंड मेहनत घेतली आहे, पण बहुतेकवेळा त्याला टेलएंडर्ससोबत खेळावं लागतं, त्यामुळे त्याला मोठा स्कोअर करता येत नाही. अजिंक्य रहाणेला इशारा? रविंद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवणं हा अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) इशारा मानला जात आहे. गेल्या काही काळापासून अजिंक्य रहाणे संघर्ष करत आहे. डिसेंबर महिन्यात मेलबर्नमध्ये केलेल्या शतकानंतर रहाणेला शतक करता आलेलं नाही. तसंच या सीरिजमध्येही रहाणे खराब शॉट खेळून आऊट झाल्याचं अनेकवेळा दिसलं आहे. या मॅचमध्ये रविंद्र जडेजाने आत्मविश्वास दाखवून खेळ केला, तर जडेजा अजिंक्यची जागा घेऊ शकतो. तसंच जडेजा पाचव्या क्रमांकावर स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून खेळला तर अश्विनलाही खेळण्याची संधी मिळू शकते. जडेजा याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळताना तीन त्रिशतकं केली आहेत. 3 वर्षानंतर पहिल्यांदाच 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताच्या टॉप-5 मध्ये डावखुरा बॅट्समन बॅटिंगसाठी उतरला आहे. याआधी 2018 साली ओव्हलच्या याच मैदानात शिखर धवन इंग्लंडविरुद्ध ओपनिंगला खेळला होता. योगायोगाने शिखर धवनची (Shikhar Dhawan) ती शेवटची टेस्ट होती, त्यानंतर धवनला पुन्हा भारताच्या टेस्ट टीममध्ये संधी मिळाली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, India vs england, R ashwin, Ravindra jadeja, Virat kohli

    पुढील बातम्या