मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : उमेशचा पुनरागमनात धमाका, रोहितने पकडला भन्नाट कॅच, VIDEO

IND vs ENG : उमेशचा पुनरागमनात धमाका, रोहितने पकडला भन्नाट कॅच, VIDEO

रोहितने पकडला जबरदस्त कॅच

रोहितने पकडला जबरदस्त कॅच

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या (India vs England 4th Test) दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने धमाक्यात केली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच उमेश यादवने (Umesh Yadav) इंग्लंडला दोन धक्के दिले. रोहित शर्माने (Rohit Sharma) स्लिपमध्ये डेव्हिड मलानचा जबरदस्त कॅच पकडला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 3 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या (India vs England 4th Test) दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने धमाक्यात केली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच उमेश यादवने (Umesh Yadav) इंग्लंडला दोन धक्के दिले. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेल्या क्रेग ओव्हरटनला (Craig Overton) उमेशने पहिल्याच ओव्हरला माघारी पाठवलं. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कॅच आऊट केलं.

ओव्हरटनची विकेट घेतल्यानंतर उमेश यादवने डेव्हिड मलानलाही (David Malan) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 67 बॉलमध्ये 31 न करुन मलान आऊट झाला. दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) उडी मारून मलानचा जबरदस्त कॅच पकडला. रोहितच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इशांत शर्मा (Ishant Sharma)) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांच्याऐवजी या मॅचमध्ये उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना संधी देण्यात आली आहे. शार्दुल ठाकूर या सीरिजची पहिली टेस्ट खेळला होता, पण यानंतर दुखापत झाल्यामुळे तो उरलेल्या दोन टेस्ट खेळू शकला नाही. तर उमेश यादवने बऱ्याच काळानंतर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. उमेश यादव टीमसोबत असला तरी त्याल प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळत नव्हती. उमेश यादवने मॅचच्या पहिल्या दिवशीही जो रूटची (Joe Root) महत्त्वाची विकेट घेतली. या सीरिजच्या पहिल्या तिन्ही टेस्टमध्ये जो रूटने शतकं केली होती. उमेश यादवने त्याला बोल्ड केलं.

First published:

Tags: India vs england, Rohit sharma