मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : शिक्षक दिनाला रोहित-शार्दुलने दिलं गिफ्ट, दोघांना घडवणारे एकच 'गुरू'

IND vs ENG : शिक्षक दिनाला रोहित-शार्दुलने दिलं गिफ्ट, दोघांना घडवणारे एकच 'गुरू'

शार्दुल-रोहितनी शिक्षकांना दिलं गिफ्ट

शार्दुल-रोहितनी शिक्षकांना दिलं गिफ्ट

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांनी इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल टेस्टमध्ये (India vs England 4th Test) धमाकेदार कामगिरी केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशीच (Teachers Day) या दोघांनी आपल्या शिक्षकाला हे अनमोल गिफ्ट दिलं. दिनेश लाड (Dinesh Lad) यांच्या प्रशिक्षणात शार्दुल आणि रोहितने सुरुवातीचे क्रिकेटचे धडे गिरवले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 5 सप्टेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांनी इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल टेस्टमध्ये (India vs England 4th Test) धमाकेदार कामगिरी केली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशीच (Teachers Day) या दोघांनी आपल्या शिक्षकाला हे अनमोल गिफ्ट दिलं आहे. रोहित शर्माने या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 127 रनची खेळी केली, तर शार्दुलने मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकं केली.

चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शार्दुलने शानदार 57 रनची खेळी करत भारताला 190 रनपर्यंत पोहोचवलं. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही तो 60 रन करून आऊट झाला. रोहित आणि शार्दुल यांच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडला विजयासाठी 368 रनचं आव्हान दिलं.

शार्दुल-रोहितला घडवणारे दिनेश लाड

दिनेश लाड (Dinesh Lad) यांच्या प्रशिक्षणात शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीचे क्रिकेटचे धडे गिरवले. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधीही दिनेश लाड यांनी रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला होता, हा सल्ला त्याचा कामी आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगल्या सुरुवातीनंतरही रोहितला मोठा स्कोअर करता आला नव्हता.

'या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध चांगली बॅटींग करत होता. त्याचा खेळ पाहून तो आऊट होणार नाही, असं वाटत होतं. मात्र त्यानं काही इनिंगमध्ये खराब शॉट खेळून विकेट फेकली. त्यानं इंग्लंडमध्ये ही चूक करु नये. त्यामुळे टीमचे नुकसान होईल,' असं दिनेश लाड म्हणाले होते.

'त्याला इंग्लंडमध्ये अधिक फोकस करावा लागेल. त्याने प्रत्येक बॉल त्याच्या मेरिटप्रमाणे खेळणे आवश्यक आहे. कारण, इंग्लंडमध्ये बॉल जास्त स्विंग होतो', असं लाड यांनी सांगितलं होतं. दिनेश लाड यांचा हा सल्ला रोहितच्या चांगलाच कामी आला.

दिनेश लाड हे मुंबईचा क्रिकेटपटू सिद्धेश लाड (Siddhesh Lad) याचे वडील आहेत. दिनेश लाड यांनी शार्दुललाही प्रशिक्षण दिलं. दिनेश लाड यांनीच शार्दुलला त्यांच्या बोरिवलीमधल्या दोन खोल्यांच्या घरी राहायला जागा दिली.

शार्दुलला स्वत:च्या घरात ठेवायचा निर्णय कठीण होता, पण त्याची प्रतिभा बघून याशिवाय दिनेश लाड यांना दुसरा पर्याय दिसला नाही. शार्दुल ठाकूर हा बोरिवलीपासून 86 किमी लांब असलेल्या पालघरमध्ये राहत होता. एवढ्या लांब राहिल्यामुळे शार्दुलचं नुकसान होऊ नये, अशी दिनेश लाड यांची इच्छा होती.

एका मुलाखतीमध्ये बोलताना दिनेश लाड म्हणाले, 'मी शार्दुलला 2006 साली आमच्या शाळेची टीम स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलविरुद्ध खेळताना बघितलं. शार्दुलने तारापूर विद्या मंदीरमधून खेळताना 78 रन केले आणि 5 विकेट घेतल्या. तेव्हाच शार्दुलला आपल्या टीममध्ये घ्यायचं मी ठरवलं. याबद्दल मी त्याच्या वडिलांशीही बोललो.'

'शार्दुलच्या वडिलांनी सुरुवातीला नकार दिला, कारण त्याने 10वीची परीक्षा दिली होती आणि पालघरवरून मुंबईला येण्यासाठी अडीच तासांचा वेळ लागतो, जे खूप कठीण होतं. यानंतर मी पत्नीशी बोललो, आणि एका मुलाला आपल्या घरात ठेवता येईल का ते विचारलं. माझी पत्नीनेही याला होकार दिला आणि शार्दुल आमच्या घरी राहायला आला,' अशी प्रतिक्रिया दिनेश लाड यांनी दिली.

सुरुवातीला माझ्या पत्नीलाही थोडं अवघडल्यासारखं झालं, कारण माझी मुलगीही शार्दुलच्याच वयाची होती. एखाद्या अनोळखी व्यक्तीला घरात ठेवणं जोखमीचं होतं. शार्दुल आमच्या घरी एक वर्ष राहिला,असं दिनेश लाड यांनी सांगितलं.

First published:

Tags: India vs england, Rohit sharma, Shardul Thakur