मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : रोहितच्या शतकानंतर रितीकाची Flying Kiss, विराटने दिली अशी रिएक्शन, VIDEO

IND vs ENG : रोहितच्या शतकानंतर रितीकाची Flying Kiss, विराटने दिली अशी रिएक्शन, VIDEO

रोहितच्या शतकानंतर रितीकाने दिली फ्लाईंग किस

रोहितच्या शतकानंतर रितीकाने दिली फ्लाईंग किस

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) चिवट शतक झळकावलं आहे. मोईन अलीच्या (Moeen Ali) बॉलिंगवर सिक्स मारत रोहितने त्याची सेंच्युरी पूर्ण केली.

  • Published by:  Shreyas

ओव्हल, 4 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) चिवट शतक झळकावलं आहे. मोईन अलीच्या (Moeen Ali) बॉलिंगवर सिक्स मारत रोहितने त्याची सेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटमधलं रोहितचं हे 8 वं तर भारताबाहेरचं पहिलंच शतक होतं.

भारतीय टीम कठीण परिस्थितीमध्ये असताना रोहित शर्माने ही खेळी केली. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला 99 रनची आघाडी मिळाली होती, पण रोहितने पहिले केएल राहुलसोबत (KL Rahul) 83 रनची आणि मग चेतेश्वर पुजारासोबत (Cheteshwar Pujara) 100 रनपेक्षा अधिकची पार्टनरशीप केली.

रोहित शर्माची बॅटिंग पाहण्यासाठी त्याची पत्नी रितीका सजदेहदेखील (Ritika Sajdeh) आली होती. रोहितच्या शतकानंतर रितीका चांगलीच खूश झाली. एवढच नाही तर तिने रोहित शर्माला स्टेडियममधून फ्लाईंग किसही दिली.

रोहितचं शतक पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्रीदेखील (Ravi Shastri) खूश झाले. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यासह टीम इंडियाने उभं राहून रोहित शर्मासाठी टाळ्या वाजवत जल्लोष केला.

रोहित शर्माने त्याच्या या शतकी खेळीवेळीच टेस्ट क्रिकेटमधले आपले 3 हजार रनही पूर्ण केले. त्याआधी ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्माचे ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार रन पूर्ण झाले. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांनाच हा विक्रम करता आला होता.

First published:

Tags: India vs england, Rohit sharma