Home /News /sport /

IND vs ENG : विराटसाठी रोहितने घेतली 'माघार', हिटमॅनला फॅन्स करतायत सलाम!

IND vs ENG : विराटसाठी रोहितने घेतली 'माघार', हिटमॅनला फॅन्स करतायत सलाम!

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने शतक केलं, ज्यामुळे भारताचा 157 रननी ऐतिहासिक विजय झाला.

    लंडन, 8 सप्टेंबर : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने शतक केलं, ज्यामुळे भारताचा 157 रननी ऐतिहासिक विजय झाला. या विजयामुळे भारताने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथ्या टेस्टमधल्या या कामगिरीबद्दल रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. रोहित शर्मा फक्त बॅटनेच नाही तर त्याच्या मैदानाबाहेरच्या कृतीमुळेही चाहत्यांची मनं जिंकत आहे. त्याचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) फोटोतून स्वत:ला हटवलं. रोहित शर्माने ओव्हल टेस्टमधल्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले. यातल्या एका फोटोमध्ये कर्णधार कोहली उजव्या आणि रोहित शर्मा डाव्या कोपऱ्यात उभे आहेत. या फोटोमध्ये विराट कोहली दिसण्यासाठी रोहितने स्वत:ला क्रॉप केलं. फोटोमध्ये उजव्या बाजूला पॅड घातलेला रोहितचा पाय दिसत आहे. रोहितची ही कृती पाहून चाहते त्याला सलाम करत आहेत. अनेकवेळा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातल्या संबंधांबाबत अफवा पसरवल्या जातात, पण ही पोस्ट बघून असं काही वाटत नाही. ओव्हल टेस्टमध्ये रोहितने शतक केल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या विराट कोहलीने जोरदार जल्लोष केला. आयसीसी क्रमवारीत रोहितची झेप रोहित शर्माच्या या शानदार फॉर्ममुळे त्याचा आयसीसी टेस्ट क्रमवारीतही फायदा झाला आहे. रोहित आयसीसी क्रमवारीत भारताचा टॉप बॅट्समन आहे, पण आता त्याचे रेटिंग पॉईंट्स 800 पेक्षा जास्त आहेत. आपल्या करियरमध्ये पहिल्यांदाच तो एवढ्या पॉईंट्सपर्यंत पोहोचला आहे. एवढच नाही तर तो एकमेव भारतीय ओपनर आहे, ज्याने वनडे आणि टेस्टमध्येही 800 पेक्षा जास्त रेटिंग पॉईंट्स मिळवले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या