Home /News /sport /

IND vs ENG : सिराजने सोडला हमीदचा सोपा कॅच, विराट म्हणाला, 'हे बिल...'

IND vs ENG : सिराजने सोडला हमीदचा सोपा कॅच, विराट म्हणाला, 'हे बिल...'

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या अखेरच्या दिवशी (India vs England 4th Test) मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) हसीब हमीदचा (Haseeb Hameed) सोपा कॅच सोडला. यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) मोहम्मद सिराजला टोला हाणला.

    लंडन, 6 सप्टेंबर : ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाने 157 रनने मोठा विजय मिळवला आहे. याचसोबत भारताला सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळाली आहे. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 10 विकेटची गरज होती, भारताने या सगळ्या विकेट घेत ओव्हलच्या मैदानात इतिहास घडवला. 50 वर्षानंतर भारताला पहिल्यांदाच ओव्हलमध्ये विजय मिळाला. ओव्हल टेस्टच्या पहिल्या सत्रात भारताने 2 विकेट मिळाल्या, तर दुसऱ्या सत्रात 6 आणि अखेरच्या सत्रात भारताने उरलेल्या 2 विकेट घेत मॅच खिशात टाकली. लंचआधी टीम इंडियाला आणखी एक विकेट मिळाली असती पण मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) एक चूक केली. रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) बॉलिंगवर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) हसीब हमीदचा (Haseeb Hameed) सोपा कॅच सोडला. यानंतर सिराजला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. हसीब हमीदने 55 रनवर असताना जडेजाच्या बॉलिंगवर हवेत शॉट मारला आणि बॉल मिड ऑनवर उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजकडे गेला, पण त्याला हातात असलेला सोपा कॅच पकडता आला नाही. सिराजने कॅच सोडल्यानंतर कर्णधार विराट कोहलीही नाराज दिसला. विराट कोहलीने (Virat Kohli) कॅच सोडल्यावर सिराजवर निशाणाही साधला. 'ये बिल तुम्हाराही है, शाबाश दोस्त,' असं विराट म्हणाला. कॅच सोडलास, आता हमीदला तूच आऊट करं, असं विराटने सिराजला अप्रत्यक्षपणे सांगितलं. एकदा जीवनदान मिळाल्यानंतरही हसीब हमीदला मोठा स्कोअर करता आला नाही. 63 रनवर रवींद्र जडेजाने त्याला बोल्ड केलं. मोहम्मद सिराजसाठी ही मॅच निराशाजनक राहिली. पहिल्या इनिंगमध्ये त्याला एकच विकेट मिळाली, तर दुसऱ्या इनिंगमध्ये सिराजला एकही विकेट घेता आली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या