जॉनी बेयरस्टोची विकेट घ्यायच्या आधी जसप्रीत बुमराहने ओली पोपचीही (Ollie Pope) विकेट घेतली. बुमराहच्या रिव्हर्स स्विंग बॉलिंगवर ओली पोपदेखील बोल्डच झाला. पोप 2 रनवर आणि बेयरस्टो शून्य रनवर आऊट झाला.Bumrah & are on fire at the Oval Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #JonnyBairstow #MoeenAli pic.twitter.com/eBzYmaThM6
— SonyLIV (@SonyLIV) September 6, 2021
दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून उमेश यादवला 3 विकेट मिळाल्या, तर बुमराह, जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. बुमराहचा हा भेदक स्पेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फक्त भारतीयच नाही तर इंग्लंडचे चाहतेही बुमराहच्या या बॉलिंगचं कौतुक करत आहेत. सुनिल गावसकर यांनी तर बुमराहला महान बॉलरच्या यादीत टाकलं आहे. खेळपट्टीवर मदत मिळत नसेल तर बुमराह बॅट्समनला आऊट करण्यासाठी वेगळी पद्धत वापरतो, असं गावसकर म्हणाले. बुमराहची यॉर्करची रणनिती ओव्हलच्या या खेळपट्टीवर बॉल सीम किंवा स्विंग होत नव्हता. यानंतर बुमराहने आपलं यॉर्कर आणि रिव्हर्स स्विंगचं अस्त्र बाहेर काढलं. लंचपर्यंत त्याला यश मिळालं नाही, पण लंचनंतर मात्र त्याने ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर लगेचच बुमराहने जो रूटला भेदक यॉर्कर टाकला, पण जो रूट या बॉलवर थोडक्यात वाचला. आईच्या झोपेत दडलंय रहस्य जसप्रीत बुमराहच्या यॉर्करचं रहस्य त्याच्या आईच्या झोपेत दडलं आहे. लहान असताना बुमराह घरी बॉलिंगचा सराव करायचा, तेव्हा त्याची आई झोपलेली असायची. आईची झोप मोड होऊ नये म्हणून तो बॉल भिंतीच्या कोपऱ्यावर टाकायचा, त्यामुळे बॉलचा आवाज कमी व्हायचा. बुमराह रोज याच पद्धतीने सराव करायचा, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला यॉर्कर टाकायची सवय झाली. पुढे मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि बॉलिंग कोच शेन बॉण्डने (Shane Bond) बुमराहच्या बॉलिंगवर आणखी काम केलं. ओली पोपची विकेट घेतल्यानंतर बुमराहने विक्रमाला गवसणी घातली. बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा फास्ट बॉलर ठरला आहे. 24 व्या टेस्टमध्येच बुमराहने 100 विकेटचा टप्पा ओलांडला. याआधी कपिल देव यांच्या नावावर हा विक्रम होता. कपिल देव यांनी 25 टेस्टमध्ये 100 विकेट घेतल्या होत्या.There it is, the 100th Test Wicket Bumrah strikes, Pope has to walk back Tune into #SonyLIV now https://t.co/E4Ntw2hJX5 #ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #OlliePope #Wicket pic.twitter.com/7T5hD8hFhd
— SonyLIV (@SonyLIV) September 6, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Jasprit bumrah