Home /News /sport /

IND vs ENG : खेळाडूंची सुरक्षा वाऱ्यावर, पुन्हा मैदानात आलेल्या जारव्होचा बेयरस्टोला धक्का, VIDEO

IND vs ENG : खेळाडूंची सुरक्षा वाऱ्यावर, पुन्हा मैदानात आलेल्या जारव्होचा बेयरस्टोला धक्का, VIDEO

जारव्हो पुन्हा मैदानात घुसला

जारव्हो पुन्हा मैदानात घुसला

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India tour of England) खेळाडूंच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण लागोपाठ तिसऱ्या मॅचमध्ये जारव्हो (Jarvo) हा इंग्लंडचा युट्यूबर मैदानात आला आहे.

    लंडन, 3 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (India tour of England) खेळाडूंच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण लागोपाठ तिसऱ्या मॅचमध्ये जारव्हो (Jarvo) हा इंग्लंडचा युट्यूबर मैदानात आला आहे. ओव्हल टेस्टमध्ये मॅचच्या दुसऱ्या दिवशी जारव्हो पुन्हा एकदा सुरक्षा भेदून मैदानात आला. यावेळीही जारव्होने टीम इंडियाची जर्सी घातली होती. स्टेडियममधून मैदानात पळत आलेल्या जारव्होने बॉलिंग ऍक्शनही केली, तसंच त्याने नॉन स्ट्रायकर एण्डला उभ्या असलेल्या जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) धक्काही मारला. इंग्लंडची इनिंग सुरू असताना 34 व्या ओव्हरमध्ये तो मैदानात आला. जारव्होला मैदानात बघितल्यानंतर स्टेडियममधले सुरक्षा रक्षक त्याला उचलून नेण्यासाठी आले. या सगळ्या गोंधळामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. याआधी जारव्हो लॉर्ड्स आणि लीड्स टेस्टवेळीही मैदानात घुसला होता. लीड्सवर मैदानात आल्यानंतर जारव्होवर कारवाई करण्यात आली होती. जारव्होवर लीड्सच्या मैदानात आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. लीड्स टेस्टवेळी भारतीय बॅटिंगच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर जारव्हो बॅटिंगसाठी मैदानात उतरला. लीड्समध्ये हेल्मेट आणि मास्क घालून तसंच हातात बॅट घेऊन जारव्हो खेळपट्टीपर्यंत पोहोचला, तरीही सुरक्षा रक्षकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. नंतर त्याला उचलून बाहेर नेण्यात आलं. लॉर्ड्स टेस्टमध्येही जारवो टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात आला होता. सुरक्षा रक्षक, प्रेक्षक, कॉमेंटेटर आणि खेळाडू जारवोला पुन्हा पाहून आश्चर्यचकीत झाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या