Home /News /sport /

IND vs ENG 4th Test : ओव्हल टेस्टचा रोमांच वाढला, इंग्लंडने पुन्हा केलं कमबॅक

IND vs ENG 4th Test : ओव्हल टेस्टचा रोमांच वाढला, इंग्लंडने पुन्हा केलं कमबॅक

फोटो सौजन्य : इंग्लंड क्रिकेट

फोटो सौजन्य : इंग्लंड क्रिकेट

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या धमाकेदार बॅटिंगमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

    लंडन, 5 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टेस्टचा (India vs England 4th Test) रोमांच आणखी वाढला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 77/0 एवढा झाला आहे, त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या दिवशी विजयासाठी 291 रनची गरज आहे. चौथ्या दिवसाअखेरीस हसीब हमीद (Haseeb Hameed) 43 रनवर आणि रोरी बर्न्स (Rory Burns) 31 रनवर खेळत आहेत. त्याआधी ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या धमाकेदार बॅटिंगमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 466 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे इंग्लंडला 368 रनचं आव्हान मिळालं. चौथ्या दिवशी विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट गेल्यानंतर भारतीय टीम अडचणीत सापडली होती, पण पंत आणि ठाकूर यांच्यात 100 रनची पार्टनरशीप झाली. शार्दुल ठाकूर 60 रनवर आणि ऋषभ पंत 50 रन करून आऊट झाला. शार्दुल ठाकूरचं या टेस्टमधलं हे दुसरं अर्धशतक होतं. जो रूटने शार्दुल ठाकूरची आणि मोईन अलीने ऋषभ पंतची विकेट घेतली. पंत आणि ठाकूरची विकेट गेल्यानंतर उमेश यादव (Umesh Yadav) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळलं. उमेश यादवने 25 तर जसप्रीत बुमराहने 24 रनची महत्त्वाची खेळी केली. पहिल्या सत्रात भारताने रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीची विकेट गमावली. जडेजा आणि अजिंक्य रहाणेला वोक्सने आऊट केलं, तर विराटला मोईनने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. जडेजा 17 रनवर, अजिंक्य शून्यवर आणि विराट 44 रन करून आऊट झाला. इंग्लंडकडून क्रिस वोक्सला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर ओली रॉबिनसन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. जेम्स अंडरसन, क्रेग ओव्हरटन आणि जो रूट यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) झुंजार शतक केलं तर चेतेश्वर पुजारानेही (Cheteshwar Pujara) अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा 127 रनवर तर पुजारा 61 रनवर आऊट झाला. इंग्लंडच्या टीमने नवीन बॉल घेतल्यानंतर एकाच ओव्हरमध्ये ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) या दोन विकेट घेतल्या. या दोघांमध्ये 150 रनची पार्टनरशीप झाली. त्याआधी रोहितने केएल राहुलबरोबर (KL Rahul) 83 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या