मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG 4th Test : रोहितचं चिवट शतक, ओव्हल टेस्ट रोमांचक अवस्थेत!

IND vs ENG 4th Test : रोहितचं चिवट शतक, ओव्हल टेस्ट रोमांचक अवस्थेत!

रोहित शर्माचं खणखणीत शतक

रोहित शर्माचं खणखणीत शतक

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने चिवट शतक (Rohit Sharma Century) केलं आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 4 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने चिवट शतक (Rohit Sharma Century) केलं आहे, त्यामुळे ही टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 270/3 एवढा झाला आहे. विराट कोहली 22 रनवर आणि रविंद्र जडेजा 9 रनवर नाबाद खेळत आहेत. भारताची आघाडी आता 171 रनपर्यंत पोहोचली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात भारताने 43/0 अशी केली, पण हा दिवस गाजवला तो रोहित शर्माने. रोहितने टेस्ट क्रिकेटमधं त्याचं 8 वं शतक केलं. रोहित शर्माने पहिले केएल राहुल आणि मग चेतेश्वर पुजारासोबत महत्त्वाची पार्टनरशीप केली.

127 रन करून रोहित शर्मा आऊट झाला, तर पुजाराने 61 रनची खेळी केली. रोहित आणि पुजारा यांच्यामध्ये 150 रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडच्या टीमने नवीन बॉल घेतल्यानंतर लगेचच एकाच ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या. ओली रॉबिनसनने रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराला आऊट केलं.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने केएल राहुलच्या रुपात एकमेव विकेट गमावली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात 83 रनची पार्टनरशीप झाली. जेम्स अंडरसनच्या बॉलिंगवर केएल राहुल 46 रनवर आऊट झाला.

पहिल्या दोन दिवसांमध्येच या मॅचच्या दोन इनिंग झाल्या. पहिल्या दिवशी भारताचा 191 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 290 रन केले.

First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara