लंडन, 3 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोन्ही ओपनरनी टीम इंडियाला सावरलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 43/0 एवढा झाला आहे. भारतीय टीम अजूनही 56 रननी पिछाडीवर आहे. केएल राहुल 22 रनवर तर रोहित शर्मा 20 रनवर खेळत आहे. त्याआधी भारतीय बॉलर्सना तळाच्या विकेट घेण्यात पुन्हा एकदा अपयश आलं. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 290 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे त्यांना 99 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे. 62 रनवर इंग्लंडने त्यांच्या 5 विकेट गमावल्या होत्या, पण अखेरच्या 5 विकेट घेण्यात भारतीय टीमला संघर्ष करावा लागला, याचसह भारतीय बॉलर्सनी रनही जास्त दिल्या. इंग्लंडकडून ओली पोपने (Ollie Pope) सर्वाधिक 81 रन केले, तर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 37 आणि मोईन अलीने (Moeen Ali) 35 रनची खेळी केली. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या क्रिस वोक्सने (Chris Woakes) 50 रन केले. भारताकडून उमेश यादवने (Umesh Yadav) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पहिल्या दिवशी भारतीय बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) केलेल्या धडाकेबाज अर्धशतकामुळे भारताला 191 रनपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारताच्या बॉलर्सची शानदार कामगिरी करत टीमला मॅचमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 53/3 एवढा होता.
LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंडच्या दोन्ही ओपनरना स्वस्तात माघारी पाठवलं. रोरी बर्न्स (Rory Burns) 5 रनवर तर हसीब हमीद (Haseeb Hameed) शून्य रनवर आऊट झाले. यानंतर उमेश यादवने (Umesh Yadav) फॉर्ममध्ये असलेल्या जो रूटला (Joe Root) बोल्ड केलं. या सीरिजच्या पहिल्या तिन्ही टेस्टमध्ये जो रूटने तीन शतकं केली होती.
या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताने या मॅचसाठी टीममध्ये दोन बदल केले. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. 5 टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england