मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट-अजिंक्य-पुजारा, तुमची 'हौस' कधी फिटणार? त्याच चुकांनी टीम इंडियाचा घात केला

IND vs ENG : विराट-अजिंक्य-पुजारा, तुमची 'हौस' कधी फिटणार? त्याच चुकांनी टीम इंडियाचा घात केला

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या (India vs England Third Test) मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या तासामध्येच टीम इंडियाची मिडल ऑर्डर गडगडली आहे.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या (India vs England Third Test) मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या तासामध्येच टीम इंडियाची मिडल ऑर्डर गडगडली आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आऊट झाले. या तिन्ही खेळाडूंच्या त्याच चुकांमुळे टीम इंडियाचा मात्र घात झाला आहे.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला एकही रन न काढता पुजारा आऊट झाला. 91 रनवर ओली रॉबिनसनने त्याला एलबीडब्ल्यू केलं. रॉबिनसनच्या बॉलिंगवर पुजाराने शॉट खेळला नाही. स्विंग झालेला बॉल पुजाराच्या पॅडवर येऊन आदळला, यानंतर इंग्लंडने अपील केलं, पण अंपायरने त्याला आऊट दिलं नाही. अखेर कर्णधार जो रूटने रिव्ह्यू घेतला आणि यात पुजारा आऊट झाला.

पुजाराची विकेट गेल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, पण यानंतर विराट पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीने आऊट झाला. ओली रॉबिनसनच्या बॉलिंगवर ड्राईव्ह मारण्याच्या नादात विराटने स्लिपमध्ये जो रूटला कॅच दिला. या सीरिजमध्ये विराट वारंवार ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला आहे. आऊट झाल्यानंतर विराटला त्याची चूक कळाली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आऊट झाल्यानंतर विराटने बॅटने बॉल सोडण्याचा सराव केला. 55 रन करून विराट माघारी परतला.

विराट आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणेही ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल खेळण्याच्या नादात जॉस बटलरला कॅच देऊन बसला. सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्यानंतर सावध खेळण्याची गरज असतानाही रहाणेने खराब शॉट मारला. विराटप्रमाणेच अजिंक्यदेखील या सीरिजमध्ये ड्राईव्ह मारण्याच्या नादात याआधीही आऊट झाला आहे.

टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) यानेही निराशा केली आहे. जेवढा काळ पंत खेळपट्टीवर होता, तेव्हा तो संघर्ष करतानाच दिसला. रॉबिनसनच्या बॉलिंगवर पंतने स्लिपमध्ये कॅच दिला.

चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना मागच्या दोन वर्षात शतक करता आलेलं नाही, तर अजिंक्य रहाणेच्या कामगिरीतही सातत्य नाही. सीरिजच्या सुरुवातीपासूनच ऑफ स्टम्पबाहेरचे बॉल खेळून भारताच्या मधल्या फळीने विकेट गमावल्या आहेत. इंग्लंडनेही याच रणनितीचा वापर करून भारतीय बॅट्समनना जाळ्यात अडकवलं आहे, तरीदेखील भारताचे दिग्गज बॅट्समन जुन्या चुकांमधून सुधारताना दिसत नाहीयेत.

First published:

Tags: India vs england, Pujara, Virat kohli