• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs ENG 3rd Test : टीम इंडियाने लीड्सवर लाज घालवली, इंग्लंडचा दणदणीत विजय

IND vs ENG 3rd Test : टीम इंडियाने लीड्सवर लाज घालवली, इंग्लंडचा दणदणीत विजय

टीम इंडियाची पुन्हा खराब कामगिरी

टीम इंडियाची पुन्हा खराब कामगिरी

इंग्लंडविरुद्ध लीड्सवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs England Third Test) टीम इंडियाने लाज घालवली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 278 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे भारताने हा सामना इनिंग आणि 76 रनने गमावला आहे.

  • Share this:
    हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्ध लीड्सवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs England Third Test) टीम इंडियाने लाज घालवली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 278 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे भारताने हा सामना इनिंग आणि 76 रनने गमावला आहे. दिवसाची सुरुवात भारताने 215/2 अशी केली होती. पण दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 91 रन करून आऊट झाला. पुजाराची विकेट गेल्यानंतर भारताची बॅटिंग पुन्हा एकदा गडगडली. विराट कोहलीने (Virat Kohli) अर्धशतकी खेळी केली, पण तो पुन्हा एकदा ड्राईव्ह मारायच्या नादात आपली विकेट देऊन बसला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हेदेखील खराब शॉट मारून आऊट झाले. इंग्लंडकडून ओली रॉबिनसनला (Ollie Robinson) सर्वाधिक 5 विकेट मिळाल्या, तर क्रेग ओव्हरटनने 3 विकेट घेतल्या. जेम्स अंडरसन आणि मोईन अलीला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. पहिल्या दिवशी 78 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडने रनचा डोंगर उभारला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा 432 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे इंग्लंडला 354 रनची आघाडी मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने खणखणीत शतक झळकावलं. या सीरिजच्या तीन मॅचमधलं रूटचं हे तिसरं तर भारताविरुद्धचं 8 वं शतक होतं. रूटशिवाय इंग्लंडचे दोन्ही ओपनर रोरी बर्न्स (Rory Burns) आणि हसीब हमीद (Haseeb Hameed) यांनी तसंच डेव्हिडन मलान (David Malan) यानेही अर्धशतकी खेळी केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आता इंग्लंडने 1-1 ने बरोबरी केली आहे. नॉटिंघममधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला होता. सीरिजची चौथी टेस्ट आता 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये सुरू होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published: