मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG 3rd Test : रोहित-पुजाराचं अर्धशतक, तरी टीम इंडियाला 'लीड्स' दूर!

IND vs ENG 3rd Test : रोहित-पुजाराचं अर्धशतक, तरी टीम इंडियाला 'लीड्स' दूर!

पुजारा-रोहित मैदानात

पुजारा-रोहित मैदानात

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (India vs England Third Test) टीम इंडियाच्या बॅट्समननी झुंजार खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 215/2 एवढा आहे.

  • Published by:  Shreyas
हेडिंग्ले, 27 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (India vs England Third Test) टीम इंडियाच्या बॅट्समननी झुंजार खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 215/2 एवढा आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 91 रनवर आणि विराट कोहली (Virat Kohli) 45 रनवर खेळत आहेत. दिवसभरात भारताने दोनच विकेट गमावल्या असल्या तरी भारत अजूनही 139 रनने पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने इंग्लंडचे उरलेले दोन्ही बॅट्समन लवकर आऊट केले. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी टीमला सावध सुरुवात करून दिली. पण लंचआधी केएल राहुल (KL Rahul) आऊट झाला. क्रेग ओव्हरटनच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जॉनी बेयरस्टोने राहुलचा भन्नाट कॅच पकडला. राहुलची विकेट गेल्यानंतर लगेचच लंच घेण्यात आला. केएल राहुल 8 रन करून माघारी परतला. केएल राहुलची विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात महत्त्वाची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा 59 रन करून आऊट झाला. रोहितची विकेट गेल्यानंतर पुजारा आणि विराटने भारताला एकही धक्का लागू दिला नाही. या दोघांमध्ये नाबाद 99 रनची पार्टनरशीप झाली आहे. इंग्लंडकडून ओली रॉबिनसन आणि क्रेग ओव्हरटनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पहिल्या दिवशी 78 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडने रनचा डोंगर उभारला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा 432 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे इंग्लंडला 354 रनची आघाडी मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने खणखणीत शतक झळकावलं. या सीरिजच्या तीन मॅचमधलं रूटचं हे तिसरं तर भारताविरुद्धचं 8 वं शतक होतं. रूटशिवाय इंग्लंडचे दोन्ही ओपनर रोरी बर्न्स (Rory Burns) आणि हसीब हमीद (Haseeb Hameed) यांनी तसंच डेव्हिडन मलान (David Malan) यानेही अर्धशतकी खेळी केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा इंग्लंडला ऑल आऊट केल्यानंतर आता भारतीय बॅट्समनची खरी परीक्षा सुरू होणार आहे. यासंपूर्ण सीरिजमध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळीने निराशा केली आहे. विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहेत. विराट आणि पुजाराला मागच्या दोन वर्षात एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलं नाही. तर अजिंक्य रहाणेने लॉर्ड्स टेस्टमध्ये अर्धशतक केलं होतं. रोहित शर्मालाही (Rohit Sharma) या सीरिजमध्ये चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठा स्कोअर करता आलेला नाही.
First published:

Tags: India vs england

पुढील बातम्या