Home /News /sport /

IND vs ENG 3rd Test : रूटची शतकांची हॅट्रिक, लीड्स टेस्टमधून टीम इंडिया 'आऊट'

IND vs ENG 3rd Test : रूटची शतकांची हॅट्रिक, लीड्स टेस्टमधून टीम इंडिया 'आऊट'

जो रूटचं आणखी एक खणखणीत शतक

जो रूटचं आणखी एक खणखणीत शतक

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड (India vs England Third Test) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 423/8 एवढा झाला आहे, त्यामुळे इंग्लंडकडे आता 345 रनची आघाडी झाली आहे.

पुढे वाचा ...
    हेडिंग्ले, 26 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड (India vs England Third Test) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 423/8 एवढा झाला आहे, त्यामुळे इंग्लंडकडे आता 345 रनची आघाडी झाली आहे. क्रेग ओव्हरटन 24 रनवर आणि ओली रॉबिनसन शून्य रनवर खेळत आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने तीन मॅचमधलं तिसरं शतक झळकावलं. 121 रन करून रूट आऊट झाला, भारताविरुद्धचं हे रूटचं 8 वं शतक होतं. रूटशिवाय रोबी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान (David Malan) यांनीही अर्धशतकं केली. मलान 70 रन करून आऊट झाला. पहिल्या सत्रात (India vs England Third Test) भारताला इंग्लंडच्या दोन्ही ओपनरना आऊट करण्यात यश आलं. आजच्या दिवसाचा सुरुवात इंग्लंडने 120 रनवर एकही विकेट न गमावता केली. मोहम्मद शमीने (Mohammad Shami) रोरी बर्न्सच्या (Rory Burns) रुपात इंग्लंडला पहिला धक्का दिला. बर्न्स 61 रन करून आऊट झाला, तर हसीब हमीदला (Haseeb Hameed) रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 68 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताकडून मोहम्मद शमीला 3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. जसप्रीत बुमराहने जो रूटची एकमेव विकेट घेतली. पहिल्या दिवशी टॉस जिंकून घेतलेला बॅटिंगचा निर्णय टीम इंडियाच्या चांगलाच अंगाशी आला. अवघ्या 40 ओव्हरमध्ये भारताचा 78 रनवर ऑल आऊट झाला. LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ओपनर केएल राहुल (KL Rahul) शून्यवर आऊट झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 1 रनवर आणि कर्णधार विराट कोहली 7 रनवर माघारी परतले. जेम्स अंडरसनने (James Anderson) भारताला तिन्ही धक्के दिले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण लंचच्या आधी अजिंक्य रहाणे 18 रन करून आऊट झाला. लंचनंतरही रोहित शर्मा 19 रनवर पॅव्हेलियनमध्ये गेला. रोहित आणि रहाणे या दोघांनाच दोन आकडी स्कोअर करता आला. भारताचे इतर सगळे बॅट्समन एक आकडी स्कोअर करून आऊट झाले. भारताची अवस्था 67/5 अशी होती, पण याच स्कोअरवर पुढच्या 4 विकेट पडल्या आणि अवघ्या काही क्षणांमध्ये भारताचा स्कोअर 67/9 असा झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या