मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 150 च्या वेगाचा बॉल 250 च्या स्पीडने मैदानाबाहेर, उमरान मलिकसाठी टीम इंडियाने घाई केली?

IND vs ENG : 150 च्या वेगाचा बॉल 250 च्या स्पीडने मैदानाबाहेर, उमरान मलिकसाठी टीम इंडियाने घाई केली?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमरान मलिक महागडा बॉलर ठरला. 4 ओव्हरमध्ये मलिकने 56 रन दिले, त्यामुळे त्याला संधी द्यायची टीम इंडियाने घाई केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नॉटिंघम, 10 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs England T20) भारताने पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्या, त्यामुळे रोहितच्या टीमने सीरिज आधीच खिशात टाकली आहे. सीरिज जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मोठ्या प्रमाणावर बदल केले. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांना विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्याऐवजी श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, आवेश खान आणि उमरान मलिक यांना संधी देण्यात आली.

पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला जिंकवून देणाऱ्या भुवनेश्वर, हार्दिक आणि बुमराहला काढल्याचा फटका टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर बसला. पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून तब्बल 215 रन केले. इंग्लंडचा टीम इंडियाविरुद्धचा टी-20 फॉरमॅटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. भारताकडून उमरान मलिकने (Umran Malik) 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक 56 रन दिले. मलिकला एक विकेट घेण्यात यश आलं.

आयर्लंड दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमधून उमरान मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण त्याला अजून छाप पाडण्यात यश आलं नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात (IPL 2022) हैदराबादकडून (SRH) खेळताना उमरान मलिकने धमाकेदार कामगिरी केली होती. सातत्याने 150 किमी वेगाने बॉल टाकत उमरान मलिकने दिग्गज खेळाडूंनाही आयपीएलमध्ये त्रास दिला.

आयपीएलमधल्या याच कामगिरीच्या जोरावर उमरान मलिकची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड झाली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही मलिकने वेगात बॉलिंग टाकली, पण त्याच वेगाने इंग्लंडच्या बॅट्समननी बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर पाठवला.

याआधी आयपीएलमधली कामगिरी पाहून वरुण चक्रवर्ती, टी नटराजन आणि व्यंकटेश अय्यर यांची टीम इंडियात निवड झाली होती, पण त्यांनाही काही मॅचनंतरच टीम इंडियातलं स्थान गमवावं लागलं, त्यामुळे आयपीएलमधली कामगिरी पाहून टीम इंडियात निवड करण्याची फास्ट ट्रॅक प्रक्रिया किती योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: India vs england