नॉटिंघम, 10 जुलै : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लंडचा (India vs England 3rd T20) कर्णधार जॉस बटलरने (Jos Buttler) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टीममध्ये तब्बल चार बदल केले आहेत. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचे मॅच विनर ठरलेले भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांना विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना देखील आराम देण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला आहे. त्यांच्याऐवजी रवी बिष्णोई, आवेश खान, उमरान मलिक आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाने या सीरिजमध्ये आधीच 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे रोहित शर्माने आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे इंग्लंडनेही त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. पार्किनसन आणि करन यांच्याऐवजी रीस टॉपली आणि फिल सॉल्ट यांना संधी मिळाली आहे.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
भारतीय टीम
रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक, रवी बिष्णोई
इंग्लंडची टीम
जेसन रॉय, जॉस बलर, डेव्हिड मलान, फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, मोईन अली, डेव्हिड विली, क्रिस जॉर्डन, रीस टॉपली, रिचर्ड ग्लीसन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Team india