मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : फक्त एक पाऊल दूर... आज जिंकलो तर रोहित पॉण्टिंगचा 19 वर्ष जुना विक्रम मोडणार!

IND vs ENG : फक्त एक पाऊल दूर... आज जिंकलो तर रोहित पॉण्टिंगचा 19 वर्ष जुना विक्रम मोडणार!

भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टी-20 मॅच (India vs England 3rd T20) आज नॉटिंघममध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma) इतिहास घडवण्याची संधी आहे.

नॉटिंघम, 10 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टी-20 मॅच (India vs England 3rd T20) आज नॉटिंघममध्ये खेळवली जाणार आहे. तीन मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत, त्यामुळे आधीच सीरिज भारताच्या नावावर झाली आहे. आता रविवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma) इतिहास घडवण्याची संधी आहे. जर रोहित शर्माने आजची टी-20 मॅच जिंकली तर तो रिकी पॉण्टिंगचं लागोपाठ 20 मॅच जिंकण्याचं रेकॉर्ड मोडेल.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगच्या नावावर हा विक्रम आहे. पॉण्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2003 साली लागोपाठ 20 मॅच जिंकल्या होत्या. रोहित शर्मा या आकड्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. या मॅचमध्ये विजय झाला तर टीम इंडिया इंग्लंडला व्हाईटवॉशही करेल.

रोहित शर्मा या मॅचसाठी मैदानात उतरताच त्याच्या नावावर आणखी एक विक्रम होणार आहे. रोहित शर्मा हा सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा खेळाडू ठरेल. रोहितची ही 127वी आंतरराष्ट्रीय मॅच असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर आल्यामुळे या सामन्यात टीम इंडियामध्ये काही बदल दिसू शकतात. दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh Karthik) दीपक हुड्डाला (Deepak Hooda) पुन्हा प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तर बॉलरमध्ये हर्षल पटेलऐवजी उमरान मलिकला (Umran Malik) खेळवलं जाऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: India vs england, Rohit sharma