मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : सर जडेजाची फिल्डिंगमध्येही कमाल, एकाच ओव्हरमध्ये पकडले दोन जबरदस्त कॅच, Video

IND vs ENG : सर जडेजाची फिल्डिंगमध्येही कमाल, एकाच ओव्हरमध्ये पकडले दोन जबरदस्त कॅच, Video

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) गणना जगातल्या सर्वोत्तम फिल्डरमध्ये केली जाते. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. इंग्लंडविरुद्ध (India vs England 3rd ODI) मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात जडेजाने दोन उत्कृष्ट कॅच पकडले.

पुढे वाचा ...

मॅनचेस्टर, 17 जुलै : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) गणना जगातल्या सर्वोत्तम फिल्डरमध्ये केली जाते. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. इंग्लंडविरुद्ध (India vs England 3rd ODI) मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात जडेजाने दोन उत्कृष्ट कॅच पकडले. हे दोन्ही कॅच जडेजाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) एकाच ओव्हरमध्ये घेतले.

हार्दिकने सगळ्यात आधी लियाम लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इनिंगच्या 37व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर लिव्हिंगस्टोनने फाईन लेगच्या वरून सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बाऊंड्री लाईनच्या जवळ उभ्या असलेल्या जडेजाने स्वत:वर नियंत्रण ठेवत जबरदस्त कॅच पकडला. याच्या दोन बॉलनंतर हार्दिकच्याच बॉलिंगवर जडेजाने इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरचाही कॅच पकडला.

जॉस बटलरचा हा कॅच पहिल्या कॅचपेक्षा जबरदस्त होता, कारण जडेजाला बॉल पकडण्यासाठी खूप धावायला लागलं. यानंतर त्याने उडी मारून कॅच पकडला. बटलरची विकेट गेल्यानंतर इंग्लंडची बॅटिंग गडगडली. जडेजाच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा 45.5 ओव्हरमध्ये 259 रनवर ऑलआऊट झाला. बटलरने सर्वाधिक 60 रन केले. तर जेसन रॉयने 41 आणि मोईन अलीने 34 रनची खेळी केली. याशिवाय क्रेग ओव्हरटनने 32 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27 रन केले. भारताकडून हार्दिक पांड्याने 4 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहलला 3 आणि सिराजला 2 तर जडेजाला 1 विकेट मिळाली.

First published:

Tags: India vs england, Ravindra jadeja