मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : कोहलीचा सल्ला ऐकून सिराजने घेतला बदला, इंग्लंडचे दोन हुकमी एक्के शून्यवर माघारी, Video

IND vs ENG : कोहलीचा सल्ला ऐकून सिराजने घेतला बदला, इंग्लंडचे दोन हुकमी एक्के शून्यवर माघारी, Video

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj)खेळवण्यात आलं. सिराजने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. सिराजच्या या कामगिरी मागे विराट कोहलीचाही (Virat Kohli) हात होता.

मॅनचेस्टर, 17 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England 3rd ODI) कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाल्यामुळे मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj)खेळवण्यात आलं. सीरिजची पहिलीच मॅच खेळणाऱ्या सिराजनेही रोहितला अजिबात निराश केलं नाही. सिराजने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. सिराजच्या या कामगिरी मागे विराट कोहलीचाही (Virat Kohli) हात होता. ओव्हरच्या आधी कोहलीने विराटला काहीतरी सांगितलं, यानंतर त्याने रूट (Joe Root) आणि बेयरस्टो (Jonny Bairstow) या इंग्लंडच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना शून्य रनवर माघारी पाठवलं.

विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट सिराजसोबत बोलत असल्याचं दिसत आहे. विराटसोबतच्या चर्चेनंतर सिराजला दोन विकेट मिळाल्या.

टॉस जिंकून पहिले बॉलिंगला आल्यानंतर मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये जेसन रॉयने 3 फोर मारले. यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी सिराज बॉलिंगला आला. विराटने सिराजला काहीतरी टिप्स दिल्या, यानंतर तिसऱ्याच बॉलला जॉनी बेयरस्टोचा कॅच श्रेयस अय्यरने पकडला. तीन बॉल खेळलेल्या बेयरस्टोला एकही रन करता आली नाही. यानंतर विराटने पुन्हा एकदा सिराजसोबत चर्चा केली. मग ओव्हरच्या शेवटच्या बॉलला स्लिपमध्ये रोहित शर्माने जो रूटचा कॅच पकडला. बेयरस्टोप्रमाणेच रूटही 3 बॉल खेळला आणि शून्य रनवर आऊट झाला. या सीरिजमध्ये रूट दुसऱ्यांदा शून्यवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या वनडेमध्येही रूट शून्य रनवरच आऊट झाला होता.

सिराजने घेतला बदला

या महिन्याच्या सुरूवातीला एजबॅस्टन टेस्टमध्ये इंग्लंडने विक्रमी विजय मिळवला. शेवटच्या इनिंगमध्ये इंग्लंडने 378 रनचा यशस्वी पाठलाग केला. टेस्ट इतिहासामधला इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. जो रूट आणि जॉनी बेयरस्टो यांच्या नाबाद शतकांच्या मदतीने इंग्लंडला हा विक्रम करता आला. या सामन्यात दोघांनीही सिराजची जोरदार धुलाई केली होती. आता सिराजने याच दोघांना शून्य रनवर आऊट करून भारताचा बदला पूर्ण केला.

First published:

Tags: India vs england, Virat kohli