मॅनचेस्टर, 17 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियाला (India vs England 3rd ODI) मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय (Jasprit Bumrah) टीम इंडिया मैदानात उतरत आहे. बुमराहला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संधी देण्यात आली आहे. पहिल्या वनडेमध्ये बुमराहने इंग्लंडच्या बॅटिंगला भगदाड पाडत 6 विकेट घेतल्या होत्या. कोणत्याही भारतीय बॉलरची ही इंग्लंडविरुद्धची ही सर्वोत्तम कामगिरी होती.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना करो या मरो आहे, कारण सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताचा 10 विकेटने तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 100 रननी विजय झाला होता. सीरिजची ही शेवटची मॅच असल्यामुळे या सामन्यात ज्यांचा विजय होईल ते सीरिजही जिंकतील.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
भारतीय टीम
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंडची टीम
जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रेडन कार्स, रीस टॉपली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Jasprit bumrah