मॅनचेस्टर, 17 जुलै : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडचा (India vs England 3rd ODI) 259 रनवर ऑल आऊट झाला. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहलला 3 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला 2 आणि रवींद्र जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. हार्दिकने 7 ओव्हरमध्ये 3 मेडन आणि 24 रन देत 4 विकेट घेतल्या. वनडे क्रिकेटमधली त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. मॅचच्या दुसऱ्या आणि सिराजच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जॉनी बेयरस्टो आणि जो रूट शून्य रनवर आऊट झाले. इंग्लंडकडून कर्णधार जॉस बटलरने सर्वाधिक 60 रन केले. याशिवाय जेसन रॉयने 41, मोईन अलीने 34 तर स्टोक्स-लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 27 रन केले. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या क्रेग ओव्हरटनने 33 बॉलमध्ये 32 रन केले, ज्यामुळे इंग्लंडला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
3 वनडे मॅचची ही वनडे सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 10 विकेटने तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 100 रननी विजय झाला, त्यामुळे आज विजय मिळवणारी टीम सीरिजवरही कब्जा करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, India vs england