लंडन, 16 ऑगस्ट : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमकतेमुळे ओळखला जातो. मग बॅटिंग असो किंवा फिल्डिंग. प्रत्येक ठिकाणी विराट 100 टक्के द्यायचा प्रयत्न करतो. लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 2nd Test) विराट आणखी आक्रमक झाला. दुसऱ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताने इंग्लंडला 272 रनचं आव्हान दिलं. यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा टीमचं हडल झालं. या हडलमध्ये विराटने भारतीय खेळाडूंचा जोश वाढवला. 60 ओव्हरमध्ये उत्कृष्ट फिल्डिंग करण्याचं विराटने खेळाडूंना सांगितलं.
'जर मला मैदानात कोणी हसताना दिसलं तर बघा. या 60 ओव्हमध्ये तुम्हाला जीव तोडून फिल्डिंग करायची आहे,' असं विराट टीम हडलमध्ये म्हणाला. विराट कोहलीचे हे शब्द टीम इंडियाच्या खेळाडूंचा जोश वाढवायला फायदेशीर ठरले. टीम इंडियाच्या फास्ट बॉलरनी लॉर्ड्सच्या मैदानात अक्षरश: आग ओकली. फक्त 23 ओव्हरमध्ये इंग्लंडची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती.
इंग्लंडला पहिला धक्का भारताने इनिंगच्या दुसऱ्या बॉललाच दिला. बुमराहने (Jasprit Bumrah) रोरी बर्न्सला सिराजकरवी कॅच आऊट केलं. यानंतर लगेच मोहम्मद शमीने (Mohammad Shami) डॉम सिब्लीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 16 व्या ओव्हरमध्ये इशांत शर्माने (Ishant Sharma) हसीब हमीदची विकेट घेतली. नंतर पुन्हा इशांत शर्माने चहाचा ब्रेक व्हायच्या आधी बेयरस्टोला एलबीडब्ल्यू केलं. चहापानानंतर बुमराहने जो रूटला 33 रनवर आऊट केलं. तर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) लागोपाठ 2 बॉलवर मोईन अली आणि सॅम करनची विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virat kohli