लंडन, 16 ऑगस्ट : मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्या धमाकेदार बॅटिंगमुळे भारताने लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) इंग्लंडच्या हातचा विजय हिरावून घेतला. पाचव्या दिवशी लंचनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताची इनिंग 298 रनवर घोषित केली. बुमराह आणि शमीच्या यांच्यात नाबाद 89 रनची पार्टनरशीप झाली, यामुळे इंग्लंडच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला गेला.
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या या पार्टनरशीपनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मजेशीर ट्वीट केलं आहे. या दोघांच्या पार्टनरशीपमुळे सेहवागला कोलकात्यामध्ये झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक टेस्ट आठवली. त्या मॅचमधला द्रविड-लक्ष्मणचा फोटो घेऊन सेहवागने त्यावर शमी-बुमराहचा फोटो लावला. मौज केलीत, शमी-बुमराहला सलाम, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, असं सेहवाग त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये (Jos Butller) बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) आक्रमक झाला. लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने शिव्या दिल्या आणि जोरजोरात टाळ्याही वाजवल्या.
Heat is on, Bumrah . #ENGvIND pic.twitter.com/ImuEAHiHAG
— Jon | Michael | Tyrion (@tyrion_jon) August 16, 2021
भारतीय इनिंगच्या 92 व्या ओव्हरनंतर लगेच ही घटना घडली. मार्क वूड (Mark Wood) जसप्रीत बुमराहला काही तरी म्हणाला, यानंतर बुमराहनेही त्याला उत्तर दिलं. या वादामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) पडला, बुमराहने रूटलाही ऐकवलं. मैदानातल्या अंपायरनी इंग्लंडच्या खेळाडूंना समजावलं, पण खेळाडूंनी सीमा ओलांडल्याचं बुमराह अंपायरला सांगताना दिसला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virender sehwag