मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : पुजारा-रहाणेसाठी अखेरची इनिंग, तिसऱ्या टेस्टमध्ये विराट या दोघांना खेळवणार!

IND vs ENG : पुजारा-रहाणेसाठी अखेरची इनिंग, तिसऱ्या टेस्टमध्ये विराट या दोघांना खेळवणार!

पुजारा-रहाणेला गावसकरांचा पाठिंबा

पुजारा-रहाणेला गावसकरांचा पाठिंबा

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला (India vs England 2nd Test) सुरुवातीलाच दोन धक्के लागले. केएल राहुल (KL Rahul) 129 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 1 रन करून आऊट झाला. भारताच्या टेस्ट टीममधले दोन प्रमुख खेळाडू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांचा गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 13 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला (India vs England 2nd Test) सुरुवातीलाच दोन धक्के लागले. केएल राहुल (KL Rahul) 129 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 1 रन करून आऊट झाला. भारताच्या टेस्ट टीममधले दोन प्रमुख खेळाडू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांचा गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे. चेतेश्वर पुजारा याला तर मागच्या दोन वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये शतक करता आलेलं नाही. इंग्लंडमधली चेतेश्वर पुजाराची सरासरी 20 च्या आसपास आहे.

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेची कामगिरीही निराशाजनक झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक केल्यानंतर रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे नसलेली रन धावायला गेला आणि रन आऊट झाला.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा हा फॉर्म बघता आता त्यांच्या हातात लॉर्ड्स टेस्टची एकच इनिंग असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टीममध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

विराटकडे कोणते पर्याय?

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला तर कर्णधार विराट कोहलीकडे मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. इंग्लंड दौऱ्याच्या पहिल्या टेस्ट आधी सराव करताना मयंक अग्रवालच्या डोक्याला बॉल लागला, त्यामुळे तो पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता, त्यामुळे केएल राहुलला ओपनिंगची संधी देण्यात आली. केएल राहुलने या संधीचं सोनं केलं. पहिल्या टेस्टमध्ये राहुलने 84 रन आणि दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शतक केलं. राहुलच्या या शानदार बॅटिंगमुळे त्याने ओपनिंगचं स्वत:चं स्थान पक्क केलं आहे.

केएल राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला खेळल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराऐवजी मयंक अग्रवाल खेळू शकतो किंवा तिसऱ्या क्रमांकावर विराट आणि चौथ्या क्रमांकावर मयंकला उतरवलं जाऊ शकतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मयंक अग्रवाल मधल्या फळीत खेळला होता.

दुसरीकडे अजिंक्य रहाणेऐवजी सूर्यकुमार यादव हा पाचव्या क्रमांकावरचा पर्याय आहे. सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाक्यात सुरुवात केली, त्यामुळेच सूर्यकुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. आयपीएलमध्येही सूर्यकुमार यादव सातत्याने रन करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara