मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने लॉर्ड्सवर इतिहास घडवला, इंग्लंडच्या हातातला विजय खेचून आणला

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने लॉर्ड्सवर इतिहास घडवला, इंग्लंडच्या हातातला विजय खेचून आणला

लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 2nd Test) ऐतिहासिक कामगिरी करत धमाकेदार विजय मिळवला आहे.

लंडन, 16 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 2nd Test) ऐतिहासिक कामगिरी करत धमाकेदार विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 120 रनवर ऑल आऊट झाला, यामुळे टीम इंडियाने हा सामना 151 रनने जिंकला. याचसोबत 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अखेरच्या सत्रामध्ये भारताला विजयासाठी 6 विकेटची गरज होती. भारताने या सगळ्या 6 विकेट घेत दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 3, इशांत शर्माला 2 आणि मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली.

भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली हे दोन्ही ओपनर शून्यवर आऊट झाले. यानंतर जो रूटने हसीब हमीदसोबत इंग्लंडची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, पण इशांत शर्माने पहिले हमीद आणि मग जॉनी बेयरस्टोला आऊट केलं. त्याआधी बुमराह आणि शमीने इंग्लंडच्या दोन्ही ओपनरना माघारी पाठवलं.

मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्या धमाकेदार बॅटिंगमुळे भारताने लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) इंग्लंडच्या हातचा विजय हिरावून घेतला. पाचव्या दिवशी लंचनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताची इनिंग 298 रनवर घोषित केली, त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान मिळालं. मोहम्मद शमी 56 रनवर आणि जसप्रीत बुमराह 34 रनवर नाबाद राहिले. दिवसाची सुरुवात भारताने 181/6 अशी केली होती. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) रुपात पहिली विकेट गमावली, यानंतर इशांत शर्माही (Ishant Sharma) माघारी परतला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये नाबाद 89 रनची पार्टनरशीप झाली.

दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने सुरुवातीच्या तीन विकेट लवकर गमावल्या, पण अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी शतकी पार्टनरशीप करून भारताची पडझड थांबवली. अजिंक्य रहाणे 61 रनवर तर चेतेश्वर पुजारा 45 रन करून आऊट झाले.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताचा 364 रनवर ऑल आऊट झाला. पुढे जो रूटच्या शतकामुळे इंग्लंडला 391 रनपर्यंत मजल मारता आली, त्यामुळे इंग्लंडला 27 रनची आघाडी मिळाली.

First published:
top videos

    Tags: India vs england, Rishabh pant