मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG 2nd Test Day 4 : पुजारा-रहाणेची झुंजार खेळी, पण इंग्लंडचं मॅचवर वर्चस्व

IND vs ENG 2nd Test Day 4 : पुजारा-रहाणेची झुंजार खेळी, पण इंग्लंडचं मॅचवर वर्चस्व

पुजारा-रहाणेने थांबवली टीम इंडियाची पडझड

पुजारा-रहाणेने थांबवली टीम इंडियाची पडझड

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs England 2nd Test) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी टीम इंडियाची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला.

  • Published by:  Shreyas
लंडन, 15 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs England 2nd Test) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी झुंजार खेळी करत शतकी पार्टनरशीप केली. टीम इंडियाने सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गमावल्यानंतर रहाणे आणि पुजाराने किल्ला लढवला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 181/6 एवढा झाला आहे, त्यामुळे भारताकडे आता 154 रनची आघाडी आहे. ऋषभ पंत 14 रनवर आणि इशांत शर्मा 4 रनवर नाबाद खेळत आहे. चौथ्या दिवसापासून भारताच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. यानंतर पहिल्या सत्रामध्येच टीम इंडियाला तीन धक्के बसले. केएल राहुल, रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) माघारी परतले आहेत. केएल राहुल 5 रनवर, रोहित शर्मा 21 रनवर आणि विराट कोहली 20 रनवर आऊट झाले. मार्क वूडने (Mark Wood) भारताच्या दोन्ही ओपनरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, तर सॅम करनने (Sam Curran) विराटची विकेट घेतली. लंचनंतरच्या सत्रामध्ये भारताने एकही विकेट गमावली नाही, पण चहानंतर सेट झालेले रहाणे, पुजारा आणि रवींद्र जडेजा माघारी परतले. अजिंक्य रहाणे 61 रनवर, चेतेश्वर पुजारा 41 रनवर आणि रवींद्र जडेजा 3 रनवर आऊट झाले. मार्क वूडने पुजाराला तर मोईन अलीने रहाणे-जडेजाला आऊट केलं. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला (India vs England 2nd Test) 27 रनची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने इंग्लंडचा 391 रनवर ऑल आऊट केला, यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये राहुलने 129 रनची खेळी केली होती, तर रोहित शर्मा 83 रन करून आऊट झाला होता. चांगली सुरुवात केल्यानंतरही टीम इंडियाची मधली फळी आणि तळाचे बॅट्समन अपयशी ठरले, त्यामुळे टीमला 364 रनपर्यंतच मजल मारता आली. मॅचच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने (Joe Root) केलेल्या नाबाद 180 रनच्या जोरावर इंग्लंडला छोटी पण महत्त्वाची आघाडी घेता आली. भारताविरुद्धच्या या सीरिजमध्ये रूट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक केल्यानंतर रूटने पुढच्या दोन्ही इनिंगमध्ये शतकं केली आहेत. पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केलेल्या शतकामुळे भारताच्या तोंडातला विजयाचा घास हिरावला गेला. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजची पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती.
First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara

पुढील बातम्या