लंडन, 14 ऑगस्ट : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England 2nd Test) 391 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला 27 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे. ऑल आऊट झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने पुन्हा एकदा झुंजार शतक केलं. रूट 180 रनवर नाबाद राहिला, तर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 57 रन केले. भारताकडून मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) 4 विकेट मिळाल्या, तर इशांत शर्माला (Ishant Sharma) 3 आणि मोहम्मद शमीला (Mohamad Shami) 2 विकेट मिळाल्या. या सीरिजच्या तीन इनिंगमध्ये रूटने एक अर्धशतक आणि दोन शतकं केली आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ इंग्लंड 119/3 या स्कोअरपासून सुरू केला.
LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 10 विकेट गेल्या, यातल्या 7 विकेट भारताच्या आणि 3 इंग्लंडच्या होत्या. तिसऱ्या दिवशी मात्र भारतीय बॉलरना फक्त 7 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला पाठवलं, यानंतर केएल राहुलचं (KL Rahul) शतक आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 83 रनच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 364 रन केले. जेम्स अंडरसन (James Anderson) याने पुन्हा एकदा 5 विकेट घेण्याचा विक्रम केला.
लॉर्ड्स टेस्टमध्ये जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियासमोर अडथळा बनून उभा राहिला. पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही जो रूटने शतक केलं. हे शतक आणि अखेरच्या दिवशी पडलेल्या पावसामुळे भारताला विजय मिळवता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Joe root