मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG 2nd Test Day 2 : भारताचे इंग्लंडला तीन धक्के, लॉर्ड्स टेस्ट रोमांचक अवस्थेत

IND vs ENG 2nd Test Day 2 : भारताचे इंग्लंडला तीन धक्के, लॉर्ड्स टेस्ट रोमांचक अवस्थेत

मोहम्मद सिराजने इंग्लंडला दिले दोन धक्के

मोहम्मद सिराजने इंग्लंडला दिले दोन धक्के

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रामध्ये मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के दिले. डॉम सिबली आणि हसीब हमीद या दोघांना सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याआधी दुसऱ्या दिवशी भारतीय बॅटिंग (India vs England 2nd Test) गडगडली. 364 रनवर टीम इंडियाचा ऑल आऊट झाला.

पुढे वाचा ...

लंडन, 13 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रामध्ये मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के दिले. डॉम सिबली आणि हसीब हमीद या दोघांना सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, यानंतर जो रूट आणि रोरी बर्न्स यांनी इंग्लंडला सावरलं, पण मोहम्मद शमीने बर्न्सला 49 रनवर माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 119/3 एवढा झाला आहे. जो रूट 48 रनवर आणि जॉनी बेयरस्टो 6 रनवर खेळत आहेत. इंग्लंडची टीम अजूनही 245 रनने पिछाडीवर आहे.

त्याआधी दुसऱ्या दिवशी भारतीय बॅटिंग (India vs England 2nd Test) गडगडली. 364 रनवर टीम इंडियाचा ऑल आऊट झाला. दिवसाच्या सुरुवातीला पहिल्या दोन विकेट पटापट गेल्यानंतर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक बाजू लावून धरली. 40 रनची खेळी करून जडेजा आऊट झाला. दिवसाची सुरुवात 276/3 अशी करणाऱ्या भारताला दिवसाच्या पहिल्या दोन ओव्हरमध्येच 2 धक्के लागले. केएल राहुलला (KL Rahul) रॉबिनसनने 129 रनवर आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) जेम्स अंडरसनने 1 रनवर आऊट केलं. यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण तोही 37 रन करून आऊट झाला. मार्क वूडने पंतला माघारी पाठवलं. इंग्लंडकडून जेम्स अंडरसनने (James Anderson) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) आणि मार्क वूडला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोईन अलीला एक विकेट घेण्यात यश आलं.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी पहिल्या दिवशी भारताला शतकी ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व राहिलं. 83 रन करून रोहित शर्मा आऊट झाला, तर चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) पुन्हा अपयश आलं. दिवसाच्या शेवटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 42 रनची खेळी करून माघारी परतला.

LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा

नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला आणि मॅच ड्रॉ झाली. टीम इंडियाला अखेरच्या दिवशी विजयासाठी 157 रनची गरज होती, पण पाचव्या दिवशी खेळच झाला नाही, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. आता लॉर्ड्स टेस्टदरम्यान लंडनमधलं हवामान पाचही दिवस चांगलं राहिल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी मॅचवर बनवलेली मजबूत पकड आता दुसऱ्या दिवशी आणखी मजबूत करून इंग्लंडला मॅचबाहेर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

First published:

Tags: India vs england