मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : विराट कोहलीचा तो निर्णय टीम इंडियासाठी ठरणार घोडचूक!

IND vs ENG : विराट कोहलीचा तो निर्णय टीम इंडियासाठी ठरणार घोडचूक!

विराटचा तो निर्णय टीम इंडियाला महागात पडणार

विराटचा तो निर्णय टीम इंडियाला महागात पडणार

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या (India vs England 2nd Test) बॉलर्सनी निराशा केली आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) चार फास्ट बॉलर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला, पण विराटचा हा निर्णय टीम इंडियावर उलटण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 14 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या (India vs England 2nd Test) बॉलर्सनी निराशा केली आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये टीम इंडियाला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. इंग्लंडने गमावलेल्या तीन विकेटपैकी दोन विकेट मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) लागोपाठ दोन बॉलवर घेतल्या, तर मोहम्मद शमीला (Mohammad Shami) एक विकेट मिळाली. दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माने (Ishant Sharma) या सामन्यात निराशा केली, त्याला अजूनपर्यंत एकही विकेट घेण्यात यश आलं नाही, त्यामुळे विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

लॉर्ड्स टेस्टमध्ये ऑफ स्पिनर आर.अश्विनला (R Ashwin) न खेळवण्याचा निर्णय टीम इंडियाला भारी पडू शकतो, असं मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) मांडलं आहे. दुसऱ्या दिवसापासूनच खेळपट्टी संथ झाली आहे, तसंच पिचवर असमान बाऊन्स दिसत आहे. या परिस्थितीमध्ये अश्विन उपयोगी ठरला असता, असं आकाश चोप्रा म्हणाला. या टेस्टमध्ये विराटने बुमराह (Jasprit Bumrah), शमी, सिराज आणि इशांत हे चार फास्ट बॉलर आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या ऑलराऊंडरला खेळवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अश्विनला बाहेर बसावं लागलं. पहिल्या टेस्टमध्येही अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, 'भारताची लोअर ऑर्डर खूप मठी आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा. या खेळाडूंकडून तुम्ही रनच्या अपेक्षा करू शकत नाही, त्यामुळे विराटचं अश्विनला बाहेर काढणं भारतावर उलटू शकतं, कारण तुमच्या चार फास्ट बॉलरनी बॅटने कोणतीही कमाल केली नाही. लॉर्ड्सची खेळपट्टी संथ होत आहे, त्यामुळे शेवटचे दोन दिवस अश्विन ट्रम्प कार्ड ठरला असता, कारण चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला बॅटिंग करायची आहे.'

'तुम्ही अश्विनला खेळवलं नाहीत, खेळपट्टी धीमी होत आहे. बॅटच्या एजही विकेट कीपरकडे आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूंपर्यंत पोहोचत नाहीत. उरलेले दिवस हेच चित्र पाहायला मिळेल. चौथ्या आणि पाचव्या दिवशी स्पिनरची गरज असेल,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं.

लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 364 न केले. केएल राहुलने (KL Rahul) 129 रन आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) 83 रनची खेळी केली.

First published:

Tags: India vs england, R ashwin, Virat kohli