मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : इंग्लंडचा बॉलर मध्ये आला, पंतने विचारलं टक्कर मारू का? रोहितने दिलं उत्तर, VIDEO

IND vs ENG : इंग्लंडचा बॉलर मध्ये आला, पंतने विचारलं टक्कर मारू का? रोहितने दिलं उत्तर, VIDEO

शनिवारी एजबॅस्टनमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs England 2nd T20) विजय झाला. रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला आल्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) काही बॉलनंतरच नाराज झाला.

मुंबई, 10 जुलै : शनिवारी एजबॅस्टनमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs England 2nd T20) विजय झाला. या सामन्यात भारतीय टीममध्ये विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचं कमबॅक झालं, त्यामुळे भारताला ओपनिंग जोडी बदलावी लागली. इशान किशन बाहेर झाला, तर त्याच्याऐवजी ऋषभ पंतला (Rishabh Pant) ओपनिंगची संधी मिळाली. रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला आल्यानंतर ऋषभ पंत काही बॉलनंतरच नाराज झाला.

पहिल्या ओव्हरमध्ये पंतला तिसरा बॉल खेळण्याची संधी मिळाली तेव्हा तो एक रन काढण्यासाठी धावला, पण तो धावत असताना बॉलरमध्ये आला. पंतने कोणत्याही अडचणीशिवाय रन पूर्ण केली, कारण थ्रो स्टम्पला लागला नव्हता. यानंतर पंतने रोहितला विचारलं, 'अरे यार ये सामने आ गया था। टक्कर मार दूं क्या?'. पंतच्या या प्रश्नावर रोहितनेही मजेशीर उत्तर दिलं. 'हां, मार दे' असं रोहित म्हणाला. या दोघांचं बोलणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं.

ऋषभ पंत आणि रोहित शर्मा यांच्यातल्या बोलण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्मासोबत ऋषभ पंत पहिल्यांदाच ओपनिंगला खेळला, कारण टीम मॅनेजमेंटला लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशन हवं होतं, तसंच पंतची जागा मधल्या फळीत होत नव्हती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 49 रनची जलद पार्टनरशीप केली. रोहित शर्मा 31 रनवर तर ऋषभ पंत 26 रनवर आऊट झाले.

शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, याचसोबत भारताने 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. सीरिजची शेवटची मॅच रविवारी म्हणजेच आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

First published:
top videos

    Tags: India vs england, Rishabh pant, Rohit sharma