मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : पहिल्या T20 मध्ये विजय, तरी टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट!

IND vs ENG : पहिल्या T20 मध्ये विजय, तरी टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs England T20) 50 रननी दणदणीत विजय झाला आहे. यानंतर आता शनिवार 9 जुलैला दोन्ही टीममध्ये बर्मिंघमच्या एजबॅस्टनमध्ये दुसरी लढत होणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये बदल होणार आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
साऊथम्पटन, 8 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs England T20) 50 रननी दणदणीत विजय झाला आहे. यानंतर आता शनिवार 9 जुलैला दोन्ही टीममध्ये बर्मिंघमच्या एजबॅस्टनमध्ये दुसरी लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचं टीममध्ये पुनरागमन होणार आहे. बीसीसीआयने पहिली टी-20 आणि उरलेल्या दोन टी-20 साठी वेगवेगळ्या टीमची घोषणा केली होती, त्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतरही भारतीय टीममध्ये दुसऱ्या सामन्यासाठी बदल होतील. पहिल्या टी-20 मध्ये दोन विकेट घेणाऱ्या फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला एकाच मॅचसाठी निवडण्यात आलं होतं, तर इशान किशन आणि अक्षर पटेललाही बाहेर ठेवलं जाऊ शकतं. कोहली-पंत, बुमराह-जडेजाचं कमबॅक पाचवी टेस्ट आणि पहिली टी-20 याच्यामध्ये फार अंतर नव्हतं. 5 जुलैला टेस्ट संपल्यानंतर पहिली टी-20 7 जुलैला खेळवण्यात आली, त्यामुळे विराट, बुमराह, जडेजा आणि पंत यांना पहिल्या टी-20 सामन्यातून आराम देण्यात आला होता. आता दुसऱ्या टी-20 मधून हे चौघं पुनरागमन करतील. टीम इंडिया रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, इशान किशन, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक
First published:

Tags: India vs england, Team india

पुढील बातम्या