मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियाची नवी T20 स्टाईल, या 'रन'नितीने वाढवलं विराटचं टेन्शन

IND vs ENG : टीम इंडियाची नवी T20 स्टाईल, या 'रन'नितीने वाढवलं विराटचं टेन्शन

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने (India vs England 1st T20) पहिले बॅटिंग करत 8 विकेट गमावून 198 रन केले आहेत. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 33 बॉलमध्ये सर्वाधिक 51 रन केले.

    मुंबई, 8 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने (India vs England 1st T20) पहिले बॅटिंग करत 8 विकेट गमावून 198 रन केले आहेत. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 33 बॉलमध्ये सर्वाधिक 51 रन केले. हा त्याचा टी-20 आंतरराष्ट्रीयमधला सर्वाधिक स्कोअर आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 19 बॉलमध्ये 39 तर दीपक हुड्डाने (Deepak Hooda)  17 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. इंग्लंडकडून जॉर्डन आणि मोईन अली यांना 2-2 विकेट मिळाल्या, तर टॉपली, मिल्स आणि पार्किनसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. टीम इंडियाची बदलेली रणनिती टीम इंडिया या सामन्यात बदलेल्या रणनितीसह खेळताना दिसली. पॉवरप्ले संपल्यानंतरही टीम इंडियाच्या बॅट्समननी मधल्या ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग सुरूच ठेवली. याआधी बरेच वेळा टीम इंडियाचे खेळाडू मधल्या ओव्हरमध्ये संथ खेळतात अशी तक्रार केली जायची, यावेळी मात्र हुड्डा, सूर्यकुमार यादव आणि पांड्या यांनी मिडल ओव्हरमध्येही इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या बॅट्समननी पहिल्यांदाच 10 पेक्षा जास्त बॉल खेळून 150 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या हुड्डाने 194.12, चौथ्या क्रमांकावरच्या सूर्याने 205.26 आणि पाचव्या क्रमांकावर खेळलेल्या हार्दिकने 154.55 च्या स्ट्राईक रेटने रन केले. टीम इंडियाने पहिल्या 14 ओव्हरमध्ये 150/4 एवढा स्कोअर केला, पण डेथ ओव्हरमध्ये टीमला आणखी आक्रमक होता आलं नाही. शेवटच्या 6 ओव्हरमध्ये भारताने 48 रनच्या मोबदल्यात 6 विकेट गमावल्या. विराटचं टेन्शन वाढणार? टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे, पण गेल्या काही काळापासून विराट कोहली फॉर्ममध्ये नाही. मागच्या अडीच वर्षांमध्ये विराटला एकही शतक करता आलेलं नाही. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचे बॅट्समन जर मधल्या ओव्हरमध्ये अशापद्धतीने आक्रमण करत असतील, तर मात्र विराटसाठी ही गोष्ट चिंतेची ठरू शकते, कारण त्याच्यावरही अशाच प्रकारे बॅटिंग करण्याचा दबाव असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Team india

    पुढील बातम्या