मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

IND vs ENG : रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला (India vs England T20 Series) आजपासून सुरूवात होणार आहे. कोरोनातून बरा झालेला रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा टीम इंडियाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

    मुंबई, 7 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला (India vs England T20 Series) आजपासून सुरूवात होणार आहे. कोरोनातून बरा झालेला रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा टीम इंडियाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या सामन्यात रोहित ओपनिंगला खेळेल हे निश्चित आहे, त्याच्याशिवाय टीममध्ये असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी सीनियर खेळाडूंच्या गैरहजेरीत चांगली कामगिरी केली आहे. मागच्या एका वर्षात अनेकवेळा युवा खेळाडूंनी टी-20 मध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे, त्यामुळे रोहितला प्लेयिंग इलेव्हन निवडताना डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. ऋतुराज का इशान किशन? ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्यात ओपनिंगसाठी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. किशन आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळतो. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 मध्ये त्याने 26 आणि 3 रनच केले होते, तर ऋतुराजला संधी मिळाली नव्हती. संजू सॅमसनही दावेदार संजू सॅमसनला (Sanju Samson) आयर्लंडविरुद्ध ओपनिंगची संधी मिळाली, यातल्या पहिल्या सामन्यात तो शून्य रनवर आऊट झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याने 42 बॉलमध्ये 77 रन केले. तिसऱ्या क्रमांकावर हुड्डा? दीपक हुड्डाने (Deepak Hooda) आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. तर पहिल्या मॅचमध्ये तो नाबाद राहिला. यानंतर डर्बिशायरविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने 59 रनची खेळी केली. आयपीएल 2022 पासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. उमरान मलिकचं स्थान निश्चित उमरान मलिक (Umran Malik) टीम इंडियाच्या रणनितीची भाग असल्याचं रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मधून मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये उमरान मलिकने त्याच्या स्पीडने दिग्गजांना धक्का दिला, ज्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं उघडली. भारताची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक इंग्लंडची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन जेसन रॉय, जॉस बटलर, डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपले, मॅट पार्किनसन
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या