मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : दीपक हुड्डाचा खणखणीत सिक्स, थोडक्यात बचावले रवी शास्त्री, Video Viral

IND vs ENG : दीपक हुड्डाचा खणखणीत सिक्स, थोडक्यात बचावले रवी शास्त्री, Video Viral

दीपक हुड्डाला (Deepak Hooda) टीम इंडियाकडून खेळण्याची जेवढी संधी मिळाली, त्याचं त्याने सोनं केलं आहे. गुरूवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यातही (India vs England 1st T20) हुड्डाने धमाकेदार बॅटिंग केली. हुड्डाला मोठी खेळी करण्यात अपयश आलं असलं तरी त्याने 17 बॉलमध्ये 33 रन ठोकले आणि इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं.

पुढे वाचा ...
    साऊथम्पटन, 8 जुलै : दीपक हुड्डाला (Deepak Hooda) टीम इंडियाकडून खेळण्याची जेवढी संधी मिळाली, त्याचं त्याने सोनं केलं आहे. गुरूवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यातही (India vs England 1st T20) हुड्डाने धमाकेदार बॅटिंग केली. हुड्डाला मोठी खेळी करण्यात अपयश आलं असलं तरी त्याने 17 बॉलमध्ये 33 रन ठोकले आणि इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. रोहित शर्मा (Rohit Sharma) 24 रनवर आऊट झाल्यानंतर हुड्डा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. क्रीजवर येताच हुड्डाने त्याचे इरादे स्पष्ट केले. पहिल्या बॉलला हुड्डाने एकही रन केला नाही, यानंतर मोईन अलीच्या (Moeen Ali) पुढच्या दोन बॉलला त्याने दोन सिक्स मारल्या. मोईन अली भारतीय इनिंगची पाचवी ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्या बॉलवर दीपकने लॉन्ग ऑनच्या वरून सिक्स मारला. हा बॉल थेट स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गेला, त्यावेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि माईक अथर्टन कॉमेंट्री करत होते. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॉल कॉमेंट्री बॉक्समध्ये जात असल्याचं दिसत आहे. दीपकचं आयर्लंडविरुद्ध शतक याआधी दीपक हुड्डाने आयर्लंडविरुद्धच्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही उत्कृष्ट बॅटिंग केली होती. त्याने दुसऱ्या टी-20 मध्ये 57 बॉलमध्ये 104 रनची वादळी खेळी केली. त्याआधी झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये हुड्डाने नाबाद 47 रन केले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचआधी डर्बिशायरविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातही त्याने 59 रन केले होते, ज्यामुळे भारताचा विजय झाला. भारताचा 50 रननी विजय इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पहिले बॅटिंग करत भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 198 रन केले. हार्दिक पांड्याने 51 आणि सूर्यकुमार यादवने 39 रनची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 19.3 ओव्हरमध्ये 148 रनवर ऑल आऊट झाला. पहिले अर्धशतक करणाऱ्या हार्दिक पांड्याने बॉलिंगमध्येही 4 विकेट घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. अर्शदीपची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या