'आम्ही चुका केल्या', रोहित शर्माने सांगितलं बांगलादेशविरुद्ध पराभवाचं कारण

'आम्ही चुका केल्या', रोहित शर्माने सांगितलं बांगलादेशविरुद्ध पराभवाचं कारण

भारतावर पहिल्या टी20 सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवताना बांगलादेशनं ऐतिहासिक कामगिरी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवून बांगलादेशनं ऐतिहासिक कामगिरी केली. आतापर्यंत बांगलादेशला 9 टी20 सामन्यात भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नव्हता. 3 टी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशनं 7 गडी राखून जिंकला. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातील पराभवासाठी गचाळ क्षेत्ररक्षण आणि डीआरएसचे चुकीचे निर्णय जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमच्या नाबाद 60 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदाच भारताचा टी20 मध्ये पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा 9वा सामना होता. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, फलंदाजांनी धावा केल्या होत्या. धावसंख्येचा बचाव करणं शक्य होतं. मात्र, मैदानावर आम्ही अनेक चुका केल्या आणि सामना गमावला. खेळाडुंचा अनुभव काही ठिकाणी कमी पडला. चुकांमधून ते शिकतील आणि पुढच्या वेळी चुका करणार नाहीत. डीआरएसमध्ये आमच्याकडून चूका झाल्या.

रोहित शर्माने बांगलादेशच्या संघाचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. रोहित म्हणाला की, बांगलादेश विजयाचे अधिकारी होते. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो तेव्हापासूनच आमच्यावर दबाव टाकला होता. तसचं भारताकडून क्षेत्ररक्षणही खराब झाल्याचं रोहित म्हणाला.

भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहलने टी20 मध्ये पुनरागमन केलं. त्याने 4 षटाकत 24 धावा देत एक विकेट घेतली. त्याचाबद्दल रोहित म्हणाला की, चहलने मधल्या षटकांत त्याची उपयुक्तता सिद्ध केली. ज्यावेळी फलंदाज स्थिरावतो तेव्हा त्याचा उपयोग होतो. चहलला माहिती आहे की त्याला काय करायचं आहे. म्हणूनच नेतृत्व करणंही सोपं होऊन जातं असं रोहितनं सांगितलं.

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 08:47 AM IST

ताज्या बातम्या