धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारताच रोहित शर्माने दिलं 'हे' उत्तर

धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारताच रोहित शर्माने दिलं 'हे' उत्तर

बांगलादेश दौऱ्यात विराटला विश्रांती दिल्याने रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेनंतर आता बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय खेळाडूंमध्ये ऋद्धिमान साहा आणि मोहम्मद शमी यांना घरेलू क्रिकेटमध्ये डे-नाइट कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. ईडन गार्डन्सवर दोघेही सुपर लीगच्या फायनलमध्ये खेळले आहेत.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मासुद्दा एका सामन्यात गुलाबी चेंडूने खेळला आहे. हा अनुभव डे-नाइट कसोटीत महत्त्वाचा ठरेल. रोहित म्हणाला की, डे-नाइट कसोटीसाठी मी उत्सुक आहे. इतरांबद्दल माहिती नाही पण दलीप ट्रॉफीत मी गुलाबी चेंडूने खेळलो आहे. मला चांगला अनुभव मिळाला होता.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. त्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, आता पुन्हा संधी मिळाली आहे तर चांगली कामगिरी कऱण्याचा प्रयत्न करेन आणि आम्ही सामने जिंकू.

वाचा : ‘खूप सहन केलं, आता नाही’, वर्ल्ड कपमधल्या चहा प्रकरणावर भडकली अनुष्का

एका सामन्यासाठी कि 100 सामन्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची नाही. याआधीही मी नेतृत्व केलं आहे. किती काळ कर्णधार आहे किंवा राहील याचा विचार मी करत नाही. पण जेव्हा मला नेतृत्व करण्याची संधी मिळते तेव्हा मी त्याचा आनंद घेतो असं रोहित शर्मा म्हणाला.

वाचा : क्रिकेटपटूचं मानसिक संतुलन बिघडलं, 'या' संघाला बसला मोठा धक्का

वर्ल्ड कपनंतर धोनी एकाही सामन्यात दिसलेला नाही. तसेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत तरी तो दिसेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण आताही तो संघातून बाहेर असल्यानं निवृत्तीची चर्चा होत आहे. त्याबद्दल रोहितला विचारले असता त्याने सांगितलं की, मी या गोष्टींबद्दल काहीच ऐकलं नाही.तुम्हीच याबद्दल मला सांगता आहात.

वाचा : भारतातल्या क्रिकेटच्या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात; होणार पहिला डे/नाईट कसोटी सामना

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Published by: Suraj Yadav
First published: November 1, 2019, 8:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading